Blaupunkt भारतात लाँच केले नवीन TV, सुरुवातीची किमंत केवळ 6,499 रुपये

Updated on 08-Jun-2023
HIGHLIGHTS

नवीनतम स्मार्ट TV खरेदीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध

यामध्ये 32 इंच HD, 40 इंच आणि 43 इंच FHD, 60 इंच आणि 65 इंच GTV 4K, 75 इंच QLED, GTV सामील आहेत.

फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेलमध्ये हे नवे TV डिस्काउंटसह मिळतील.

जर्मन कंपनी Blaupunkt ने भारतीय बाजारात बरेच नवे TV लाँच केले आहेत. यामध्ये 32 इंच HD, 40 इंच आणि 43 इंच FHD, 60 इंच आणि 65 इंच GTV 4K, 75 इंच QLED, GTV सामील आहेत. या नवीनतम स्मार्ट TV खरेदीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, 9 जून ते 14 जूनदरम्यान सुरु असणाऱ्या फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेलमध्ये हे नवे TV डिस्काउंटसह मिळतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन TV रेंज 6,499 रुपयांपासून सुरु होईल.  

नव्या स्मार्ट TV ची किंमत

 Blaupunkt 32 inch HD TV ची किमंत 10,888 रुपये, Blaupunkt 40 inch FHD TV ची किमंत 16,499 रुपये, Blaupunkt 43 inch FHD TV ची किंमत18,499 रुपये आहे. तर, Blaupunkt 50 इंच 4K (GTV) ची किंमत 28,999 रुपये आणि Blaupunkt 65 इंच 4K (GTV) ची किंमत 44,444 रुपये आहे. तसेच, Blaupunkt 75 इंच QLED TV ची किंमत 99,999 रुपये आहे.

32, 40 आणि 43 इंच स्मार्ट टीव्ही स्पेसिफिकेशन्स :

Blaupunkt ने पावरफूल ऑडिओ अनुभवासह नवीन स्मार्ट टीव्ही सादर केले आहेत. यामध्ये ऍडव्हान्स स्पीकर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये इनबिल्ट Netflix आणि दोन 48W बॉक्स स्पीकर उपलब्ध असतील. हे टीव्ही 1GB RAM आणि 8GB रॅमने सुसज्ज आहेत. 

Blaupunkt 50/65 इंच टीव्ही

 Blaupunkt ने 2 GB RAM आणि 16 GB ROM सह हे दोन्ही स्मार्ट टीव्ही सादर केले आहेत. यात उत्कृष्ट प्रोसेसिंग पावर आणि स्टोरेज कॅपेसिटी आहे. नवीन टीव्हीमध्ये MT9062 प्रोसेसर, फोन 60W डॉल्बी ऑडिओ स्टिरिओ बॉक्स सारखी फिचर्स मिळणार आहेत.

Blaupunkt 75 इंच टीव्ही

 75 इंच लांबीच्या QLED 4K TV सह 1.1 बिलियन कलर, 4 इन-बिल्ट स्पीकर, 60W डॉल्बी स्टिरिओ बॉक्स स्पीकर, HDR 10+, DTS TruSurround साउंड सारखी फीचर्स उपलब्ध असतील. बेजललेस डिस्प्लेसह हा एक स्लिम TV आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :