Blaupunkt ने भारतात नवीन TV लाँच केला आहे. ब्रँडच्या QLED टीव्ही कॅटेगरीतील हा सर्वात मोठा स्क्रीन साईजचा टीव्ही आहे. ज्यामध्ये आधीपासून 50, 55 आणि 65-इंच मॉडेल समाविष्ट आहेत. 75-इंच बेझल-लेस प्रीमियम टेलिव्हिजन 4K रिझोल्यूशन, डिजिटल नॉईज फिल्टर आणि Google असिस्टंटसह येतो. यात 60W चे स्पीकर आउटपुट आहे. या टीव्हीची किंमत आणि इतर वैशिष्ट्ये जाणून घेऊयात…
हे सुद्धा वाचा : Jio चा जबरदस्त रिचार्ज, अमर्यादित कॉल आणि डेटा एका वर्षासाठी उपलब्ध, पहा किंमत
Blaupunkt 75-इंच टीव्हीमध्ये 4K रिझोल्यूशनसह LED डिस्प्ले आहे. हे 550 nits ब्राइटनेस, MEMC टेक्नॉलॉजी आणि डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि HLG फॉरमॅटला सपोर्ट करते. हा टेलिव्हिजन बेझल-लेस स्क्रीन आणि अलॉय स्टँडसह एअरस्लिम डिझाइनसह येतो.
ऑडिओफाईल्ससाठी, Blaupunkt 75-इंच टीव्ही क्वाड-स्पीकरसह सुसज्ज आहे. जे डॉल्बी ऑडिओ, डॉल्बी ATMOS, DTS आणि सायबरसाउंड जनरल 2 सारख्या टेक्नॉलॉजीसाठी सपोर्टसह 60W आउटपुट देतात. टेलिव्हिजनमध्ये हँड्स-फ्रीसाठी मायक्रोफोन देखील आहे आणि Google असिस्टंट देखील आहे.
Blaupunkt 75-इंच टीव्ही 1.5GHz क्वाड-कोर MediaTek MT9602 (A53) प्रोसेसरसह 2GB RAM आणि 32GB ऑनबोर्ड स्टोरेजसह सुसज्ज आहे. हे Android TV 10 OS वर चालते, ज्यामध्ये अनेक ऍप्स आणि गेम्स आहेत. या 75-इंच लांबीच्या टीव्हीवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये WiFi, Bluetooth 5.0, तीन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट आणि इथरनेट पोर्ट यांचा समावेश आहे.
Blaupunkt 75-इंच 4K LED टीव्हीची किंमत 84,999 रुपये आहे आणि बिग बिलियन डेज सेल अंतर्गत 23 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.