Blaupunkt चा स्वस्त 75-इंचाचा स्मार्ट टीव्ही लाँच, जबरदस्त TV सह घराला बनवा सिनेमा हॉल

Blaupunkt चा स्वस्त 75-इंचाचा स्मार्ट टीव्ही लाँच, जबरदस्त TV सह घराला बनवा सिनेमा हॉल
HIGHLIGHTS

Blaupunkt 75-इंच लांबीचा TV लाँच

बिग बिलियन डेज सेल अंतर्गत खरेदीसाठी उपलब्ध होणार

नुकत्याच लाँच झालेल्या Blaupunkt QLED सह 50, 55 आणि 65-इंच टीव्ही सिरीजचे Google TV मॉडेल देखील या सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

Blaupunkt ने भारतात नवीन TV लाँच केला आहे. ब्रँडच्या QLED टीव्ही कॅटेगरीतील हा सर्वात मोठा स्क्रीन साईजचा टीव्ही आहे. ज्यामध्ये आधीपासून 50, 55 आणि 65-इंच मॉडेल समाविष्ट आहेत. 75-इंच बेझल-लेस प्रीमियम टेलिव्हिजन 4K रिझोल्यूशन, डिजिटल नॉईज फिल्टर आणि Google असिस्टंटसह येतो. यात 60W चे स्पीकर आउटपुट आहे. या टीव्हीची किंमत आणि इतर वैशिष्ट्ये जाणून घेऊयात… 

हे सुद्धा वाचा : Jio चा जबरदस्त रिचार्ज, अमर्यादित कॉल आणि डेटा एका वर्षासाठी उपलब्ध, पहा किंमत

Blaupunkt 75-इंच टीव्हीचे फीचर्स

Blaupunkt 75-इंच टीव्हीमध्ये 4K रिझोल्यूशनसह LED डिस्प्ले आहे. हे 550 nits ब्राइटनेस, MEMC टेक्नॉलॉजी  आणि डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि HLG फॉरमॅटला सपोर्ट करते. हा टेलिव्हिजन बेझल-लेस स्क्रीन आणि अलॉय स्टँडसह एअरस्लिम डिझाइनसह येतो.

ऑडिओफाईल्ससाठी, Blaupunkt 75-इंच टीव्ही क्वाड-स्पीकरसह सुसज्ज आहे. जे डॉल्बी ऑडिओ, डॉल्बी ATMOS, DTS आणि सायबरसाउंड जनरल 2 सारख्या टेक्नॉलॉजीसाठी सपोर्टसह 60W आउटपुट देतात. टेलिव्हिजनमध्ये हँड्स-फ्रीसाठी मायक्रोफोन देखील आहे आणि Google असिस्टंट देखील आहे.

Blaupunkt 75-इंच टीव्ही 1.5GHz क्वाड-कोर MediaTek MT9602 (A53) प्रोसेसरसह 2GB RAM आणि 32GB ऑनबोर्ड स्टोरेजसह सुसज्ज आहे. हे Android TV 10 OS वर चालते, ज्यामध्ये अनेक ऍप्स आणि गेम्स आहेत. या 75-इंच लांबीच्या टीव्हीवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये WiFi, Bluetooth 5.0, तीन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट आणि इथरनेट पोर्ट यांचा समावेश आहे.

Blaupunkt 75-इंच टीव्ही किंमत

Blaupunkt 75-इंच 4K LED टीव्हीची किंमत 84,999 रुपये आहे आणि बिग बिलियन डेज सेल अंतर्गत 23 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo