Blaupunkt चा सर्वात स्वस्त 40 इंच TV लाँच, किंमत फक्त 13,499 रुपये

Blaupunkt चा सर्वात स्वस्त 40 इंच TV लाँच, किंमत फक्त 13,499 रुपये
HIGHLIGHTS

Blaupunkt 40 inch Sigma Series स्वस्त स्मार्ट टीव्ही लाँच

या टीव्ही मॉडेलची किंमत 13 हजार 499 रुपये

टीव्हीची विक्री फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान केली जाणार

Blaupunkt ने आपली नवीन 40-इंच Android TV Sigma सिरीज मोठ्या स्क्रीनसह स्वस्त किमतीत लाँच केली आहे. 4 मे 2023 पासून फ्लिपकार्टवर सुरू होणाऱ्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये हा लेटेस्ट टीव्ही खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घकवता जाणून घेऊयात या टीव्हीची किमंत, फीचर्स आणि स्पेसीफिकेशन्स – 

किंमत : 

Blaupunkt च्या या 40 इंच टीव्ही मॉडेलची किंमत 13 हजार 499 रुपये ठेवण्यात आली आहे. वर सांगितल्याप्रमाणे नव्या टीव्हीची विक्री फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान केली जाणार आहे. फ्लिपकार्टचा हा सेल 4 मे पासून ते 10 मे पर्यंत चालणार आहे. 

ऑफर्स : 

यामध्ये तुम्हाला फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक कार्डने पेमेंट केल्यास 5% कॅशबॅक मिळणार आहे. तर, SBI बँक कार्डने व्यवहार केल्यास 10% झटपट सूटदेखील उपलब्ध आहे. हा नवा व्हेरिएंटचं केवळ विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार नाही, तर फ्लिपकार्ट सेलमध्ये मोठ्या सवलतीसह कंपनीचे इतर स्मार्ट टीव्ही मॉडेल्सदेखील सवलतीसह मिळतील.  

Blaupunkt 40 inch Sigma Series 

या 40-इंच टीव्ही मॉडेलमध्ये बेझल लेस डिझाइन मिळणार आहे. तर, 512 MB रॅमसह 4 GB अंतर्गत स्टोरेज मिळेल. सराउंड साउंड तंत्रज्ञान असलेल्या या टीव्हीमध्ये तुम्हाला एकूण (प्रत्येकी 20) 40 वॅट्सचा साउंड आउटपुट मिळेल.  

त्याबरोबरच, कनेक्टिव्हिटीसाठी 2 USB पोर्ट आणि तीन HDMI पोर्ट देण्यात आले आहेत. जर तुम्ही OTT प्रेमी असाल तर तुमच्यासाठी येथे खास सोय करण्यात आली आहे. या टीव्हीमध्ये Zee5, Amazon Prime Video, Sony LIV आणि Voot सारखे OTT ऍप्सचे समर्थन आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo