Blaupunkt कंपनी किफायती दरात सर्वोत्तम TV उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता Blaupunkt ने भारतात 43 इंच आणि 55 इंच लांबीचे दोन QLED टीव्ही लाँच केला आहे. या दोन्ही स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट आणि गुगल क्रोमकास्टचे सपोर्ट आहेत. त्याबरोबरच, TVमधील इतर फीचर्स बघता हे दोन्ही नवे टीव्ही भारतीय बाजारपेठेत हायसेन्स, टीसीएल आणि ओनिडा सारख्या ब्रँडच्या टीव्हींना जबरदस्त स्पर्धा देतील, असे चित्र दिसत आहे. बघुयात किंमत
Blaupunkt च्या 43-इंच (43QD7050) QLED टीव्हीची किंमत 28,999 रुपये आहे. तर, कंपनीचा 55-इंच लांबीचा (55CSGT7023) स्मार्ट टीव्ही 34,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. ऑफर बद्दल बोलायचे झाल्यास, या दोन्हींवर 10% बँक सवलत दिली जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे दोन्ही टीव्ही तुम्हाला शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वरून खरेदी करता येतील.
Blaupunkt ने या स्मार्ट टीव्हीमध्ये 43 इंच लांबीची QLED स्क्रीन दिली आहे. या स्क्रीनला HDR10+ आणि डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, स्मार्ट टीव्हीमध्ये ब्लूटूथ 5.0, HDMI पोर्ट आणि ड्युअल-बँड वाय-फाय सारखी फीचर्स आहेत. साउंडसाठी, टीव्हीमध्ये डॉल्बी ATMOS आणि डॉल्बी डिजिटल प्लसची सुविधा आहे. याशिवाय, वर सांगितल्याप्रमाणे टीव्हीमध्ये गुगल टीव्हीसोबत गुगल असिस्टंट उपलब्ध आहे. तसेच, इनबिल्ट क्रोमकास्ट देखील देण्यात आला आहे. यासह तुम्ही टीव्हीवर 1 हजाराहून अधिक Apps चालवू शकता.
वरील TV प्रमाणे याला देखील HDR10+ चा सपोर्ट देण्यात आला आहे. TV च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, डिझाईन बेझलने सुसज्ज आहे. यासोबतच, अलॉय स्टँड उपलब्ध आहे. हा स्मार्ट टीव्ही गुगल टीव्हीवर काम करतो. वर सांगितल्याप्रमाणे, यात देखील गुगल असिस्टंट आणि इनबिल्ट गुगल क्रोमकास्ट आहे. यात 2GB रॅम, 16GB स्टोरेज आणि MT9062 प्रोसेसर देखील आहे.
याशिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्ट टीव्हीमध्ये HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट, Wi-Fi आणि ब्लूटूथ 5.0 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. टीव्हीमध्ये 60W स्टीरिओ बॉक्स स्पीकर तसेच डॉल्बी डिजिटल प्लस आणि DTS ट्रूसराऊंड टेक्नॉलॉजी सपोर्ट आहे, यासह उत्तम साउंड कॉलिटीची अपेक्षा करता येते.