सध्या स्मार्ट टीव्ही विश्वात व्हॉईस कंट्रोल्ड टीव्हीच्या नवीन तंत्रज्ञानाने घरातील मनोरंजन खूप बदलले आहे. तुम्ही उत्तम सीन्स, उत्तम साउंड, गेमिंग किंवा तुमच्या होम सिस्टीमसह उत्तम एकीकरण शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी व्हॉइस कंट्रोलसह येणाऱ्या सर्वोत्कृष्ट Smart TV ची यादी तयार केली आहे. ज्यामुळे तुमचा टीव्ही पाहण्याचा अनुभव नवीन आणि चांगला होईल. पाहुयात यादी-
Also Read: जबरदस्त 50 इंच Smart TV झाले स्वस्त! 30,000 रुपयांअंतर्गत घरीच मिळेल सिनेमाहॉलची मज्जा, पहा यादी
स्मार्ट टीव्ही जगतात Sony हा ब्रँड भारतीयांसाठी एक लोकप्रिय ब्रँड आहे. Sony Bravia 75-inch 4K Ultra HD Smart LED Google TV हा एक मोठा आणि भव्य टीव्ही आहे, जो तुम्हाला घरबसल्या अगदी थिएटरचा अनुभव देतो. या टीव्हीचा कलरफुल डिस्प्ले आणि उत्तम ध्वनी प्रणाली तुमचा पाहण्याचा अनुभव आणखी चांगला करेल. या टीव्हीमध्ये व्हॉइस कंट्रोल फीचर्स उपलब्ध आहेत. तुम्ही Google असिस्टंटद्वारे कंट्रोल आणि कंटेंट सहज ऍक्सेस करू शकता.
LG चा LG 50-inch 4K UHD Smart LED TV हा एक सोपा आणि कस्टमाइज करण्यायोग्य टीव्ही आहे. हा टीव्ही विशेषत: गेमिंग प्रेमींसाठी सर्वोत्तम आहे. यात गेम ऑप्टिमायझर आणि ALLM समाविष्ट आहे, जे गेमिंग अनुभव सुधारते. हा टीव्ही देखील व्हॉइस कंट्रोलसह येतो. तसेच, यात Netflix, Hulu सारख्या प्रमुख स्ट्रीमिंग सर्व्हिसेसचे सर्मथन देखील आहे.
Samsung च्या या 65-inch Crystal 4K UHD Smart LED TV चे आकर्षक डिझाइन आणि एकाधिक कनेक्शन पर्याय कोणत्याही आधुनिक दिवाणखान्यासाठी उत्तम निवड ठरतात. सॅमसंगचा क्रिस्टल प्रोसेसर 4K UHD रिझोल्यूशनसह चमकदार आणि स्पष्ट डिस्प्ले प्रदान करतो. Bixby आणि Alexa च्या व्हॉईस कमांडद्वारे टीव्ही सहजपणे नियंत्रित केला जाऊ शकतो. त्याबरोबरच, यात HDMI, USB आणि Bluetooth पर्याय तुमच्या सर्व मीडिया कनेक्शन गरजा पूर्ण करतील.
Xiaomi च्या या 55-inch X 4K Dolby Vision Series Smart Google TV ने उत्कृष्ट फीचर्स आणि किफायतशीर किमतीमुळे टॉप स्मार्ट टीव्हीच्या यादीत स्थान मिळवले आहे. स्मार्ट फीचर्समध्ये या TVसह व्हॉइस कमांड आणि स्मार्ट होम कनेक्शनसाठी Google असिस्टंटचे सपोर्ट आहे. हा टीव्ही स्टाइलिश आणि आधुनिक डिझाइनसह येतो. जो तुमच्या हॉलची आकर्षकता वाढवतो.