Amazon ने लाँच केले नवे मोठ्या स्क्रीन आकाराचे Smart TV, जाणून घ्या किंमत आणि विशेषता

Amazon ने लाँच केले नवे मोठ्या स्क्रीन आकाराचे Smart TV, जाणून घ्या किंमत आणि विशेषता
HIGHLIGHTS

Amazon ने Fire TV Omni Mini LED सिरीज आणि अपडेटेड FIRE TV 4 सिरीज लाँच केली.

Omni सिरीजमध्ये 55 इंच पासून ते 85 इंच लांबीपर्यंतचे TV सादर केले.

टीव्ही 4 सिरीजमध्ये 43 इंच आणि 55 इंच लांबीचे स्मार्ट TV सादर केले आहेत.

प्रसिद्ध इ-कॉमर्स दिग्गज Amazon ने आपल्या फायर TV लाईनअपचा विस्तार करत Fire TV Omni Mini LED सिरीज आणि अपडेटेड FIRE TV 4 सिरीज लाँच केली आहे. मात्र, लक्षात घ्या की, हे Smart TV कंपनीने सध्या जागतिक बाजारात लाँच केले आहेत. लवकरच ते भारतात देखील उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. या उपकरणांना उत्तम पिक्चर कॉलिटी आणि चांगल्या आवाजासाठी डिझाईन केले आहे, असे कंपनीने सांगितले.

आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने Omni सिरीजमध्ये 55 इंच पासून ते 85 इंच लांबीपर्यंतचे TV सादर केले. तर, टीव्ही 4 सिरीजमध्ये 43 इंच आणि 55 इंच लांबीचे स्मार्ट TV सादर केले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेउयात संपूर्ण तपशील-

Also Read: अगदी निम्म्या किमतीत खरेदी करा 43 इंच Smart TV! Amazon वर मोठ्या प्रमाणात Discount उपलब्ध

Amazon Fire TV Omni Mini LED Series

Amazon Fire TV Mini LED Series या सिरीजमध्ये QLED डिस्प्ले मिळेल. हा टीव्ही 55, 65, 75 आणि 85 इंच लांबीच्या आकारात येतो. हा टीव्ही भारी वैशिष्ट्यांसह व्हायब्रन्ट कलर्स आणि चांगले काँट्रास्ट सुनिश्चित करतो. हा टीव्ही चांगल्या व्हिज्युअल्ससाठी डॉल्बी व्हिजन IQ आणि HDR 10+ सह समर्थित आहे. या सिरीजमध्ये इंटेलिजन्ट पिक्चर टेक्नॉलॉजीदेखील आहे. यासह कंटेंटच्या आधारावर पिक्चर सेटिंग्स ऍडजस्ट करण्यासाठी AI चा वापर करतो. गेमिंगसाठी यात AMD फ्रीसिन्क प्रीमियम प्रो, 144Hz रिफ्रेश रेट आणि लो लेटेन्सी मोड उपलब्ध आहे. हे फिचर तुमची गेमिंग परफॉर्मन्स वाढवण्यास मदत करतात.

Amazon Fire TV omni Mini LED Series ची किंमत

Amazon Fire TV Omni Mini LED Series ची किंमत

  • 55 इंच मॉडेल= 819.99 डॉलर (अंदाजे 69,000 रुपये)
  • 65 इंच मॉडेलची किंमत 1,089.99 डॉलर (अंदाजे 92,000 रुपये)
  • 75 इंच मॉडेलची किंमत 1,499.99 डॉलर (अंदाजे 1.29 लाख रुपये)
  • 85 इंच मॉडेलची किंमत 2,099.99 डॉलर (अंदाजे 1.77 लाख रुपये) आहे.

Amazon Fire TV 4 Series

अपडेटेड फायर टीव्ही 4 सीरिज अल्ट्रा-स्लिम बेजलसह 43 इंच, 50 इंच आणि 55 इंच या तीन साईजममध्ये सादर करण्यात आले आहेत. हे टीव्ही हाय कॉलिटीच्या व्युइंग एक्सपेरियन्ससाठी 4K UHD, HDR 10, HLG आणि डॉल्बी डिजिटल साऊंडच्या समर्थनसह येतो. त्याबरोबरच, यात 8W चे दोन स्पीकर, तीन HDMI 2.0 एक HDMI 2.1 ईएआरसी, एक ईथरनेट पोर्ट, एक USB, केबल, आयआर एमिटर आणि हेडफोनसारखे अनेक पोर्ट दिले गेले आहेत. हा टीव्ही फायर OS वर चालतो, ज्यात फायर टीव्ही सर्च, स्मार्ट होम कंट्रोल आणि आस्क अलेक्सा इ. फीचर्स उपलब्ध आहेत.

Amazon Fire TV 4 Series

Amazon Fire TV 4 Series ची किंमत

  • 43 इंच मॉडेलची किंमत 329.99 डॉलर (अंदाजे 28,000 रुपये)
  • 50 इंच मॉडेलची किंमत 399.99 डॉलर (अंदाजे 33,700 रुपये)
  • 55 इंच मॉडेलची किंमत 459.99 डॉलर (अंदाजे 38,800 रुपये)
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo