फक्त 25 हजारांमध्ये खरेदी करा 60 हजारांचा MI TV, मिळेल 2 वर्षांची वॉरंटी

Updated on 20-Apr-2023
HIGHLIGHTS

Xiaomi Mi Pro 50 इंच अल्ट्रा HD 4K स्मार्ट टीव्ही

स्मार्ट टीव्हीची किंमत जवळपास 25,000 रुपयांना खरेदी करता येईल.

स्मार्ट TV फ्लिपकार्टवर 30 टक्के डिस्काउंटसह मिळतोय.

Xiaomi च्या 50 इंच लांबीच्या स्मार्ट TV वर मोठी सवलत मिळत आहे. फ्लिपकार्टवर ही भारी ऑफर दिली जात आहे. या TVवर मोठी बचत होणार आहे म्हणूनच हा टीव्ही अगदी स्वस्तात खरेदी केला जाऊ शकतो. हा एक 4K LED टीव्ही आहे. या टीव्हीसह तुम्ही स्वस्तात आपल्या ग्राही थिएटरची मजा घेऊ शकता. 

Xiaomi Mi Pro 50 इंच अल्ट्रा HD 4K स्मार्ट टीव्हीवरील ऑफर्स :

या टीव्हीची MRP 59,999 रुपये आहे. जो फ्लिपकार्टवर 30 टक्के डिस्काउंटसह मिळतोय. या डिस्काउंटसह TV 41,999 रुपयांना विक्रीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. याशिवाय, SBI क्रेडिट कार्ड EMI वर 10% त्वरित सूट दिली जात आहे. HDFC बँक क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास 1500 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. टीव्ही 3,500 रुपयांच्या मंथली नो-कॉस्ट EMI पर्यायावर खरेदी केला जाऊ शकतो.

या व्यतिरिक्त, टीव्ही खरेदीवर 16,900 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास Xiaomi Mi Pro 50 इंच स्मार्ट टीव्हीची किंमत जवळपास 25,000 रुपयांपर्यंत येईल. 

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi Pro 50 मध्ये इंच लांबीचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz चा आहे. टीव्ही 4k अल्ट्रा HD सपोर्टसह येतो. यासह नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओसोबत डिजनी + हॉटस्टार आणि युट्युबचा सपोर्ट मिळेल. टीव्ही गुगल टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. टीव्हीचे साउंड आउटपुट 60W आहे. या TV वर तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी फ्लिपकार्टला भेट द्या. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :