Acer चे नवीन OLED आणि QLED टीव्ही लाँच, किमंत फक्त 13,999 रुपयांपासून सुरू
Acer ने नवीन स्मार्ट टीव्ही सिरीज लाँच केले आहेत.
स्मार्ट टीव्हीची सुरुवातीची किंमत 13,999 रुपये आहे.
Acer चा I सीरीज स्मार्ट टीव्ही 6 जूनपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार
Acer ने नवीन स्मार्ट टीव्ही सिरीज लाँच केले आहेत. Acer ने परवडणाऱ्या किमतीत QLED आणि OLED स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. कंपनीने O सिरीज फ्लॅगशिप टीव्ही सिरीज लाँच केली आहे. ही स्मार्ट टीव्ही सिरीज Google Android TV वर आधारित आहे. Acer ने 55-इंच आणि 65-इंच दोन OLED स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत.
किंमत :
स्मार्ट टीव्हीची सुरुवातीची किंमत 13,999 रुपये आहे. तर 75 इंच स्मार्ट टीव्हीची किंमत 1.49 लाख रुपयांपर्यंत जाईल. Acer चा I सीरीज स्मार्ट टीव्ही 6 जूनपासून सर्व पार्टनर्स आणि ऑनलाइन स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध असतील.
Acer च्या नव्या TV सिरीजचे मुख्य तपशील
यासोबतच V सीरीज अंतर्गत परवडणारा QLED TV देखील सादर करण्यात आला आहे. यासह, कंपनीने 32-इंच लांबीचा एंट्री-लेव्हल QLED टीव्ही लाँच केला आहे. हा TV 43-इंच, 50-इंच आणि 55-इंच स्क्रीन साईजमध्ये येतो. हे टीव्ही MEMC, Dolby Atmos आणि Vision तसेच UHD अपस्केलिंग आणि हाय एंड ब्राइटनेस सपोर्टसह ऑफर केले जात आहेत. कंपनीचा दावा आहे की स्मार्ट टीव्हीमध्ये 16 GB इंटरनल स्टोरेज दिले जाईल.
याशिवाय, 32-इंच आणि 40-इंच स्क्रीन साईजचे स्मार्ट टीव्ही I सीरिजमध्ये लाँच करण्यात आले आहेत. या I सीरीजमध्ये एक नवीन ऑडिओ सिस्टम देण्यात आली आहे, जी 30W साउंड आउटपुटसह येते. 32 इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीमध्ये 36W साउंड आउटपुट आहे. तर 40 इंच स्क्रीन आकारात 40W स्पीकर देण्यात आला आहे. UHD मॉडेल 43-इंच, 50-इंच, 55-इंच, 65-इंच आणि 75-इंच स्क्रीन साईजमध्ये येते.
Google TV आता प्रीमियम QLED W सिरीजमध्ये युनिक अँटी-ग्लेअर डिस्प्ले, वॉलपेपर डिझाइन, ऑरल साउंड आणि मोशन सेन्सरसह उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile