लवकरच आपण आपल्या मोबाईल सेवा प्रदाता कंपन्यांकडून एक वर्षाचा मोठी डाटा पॅक सुद्धा खरेदी करु शकणार आहात. अलीकडेच टेलिकॉम रेग्युलटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने सांगितले की, आता डाटा पॅकचा कालावधी 365 दिवसापर्यंत असेल. म्हणजेच जो डाटा पॅक आपल्याला केवळ 90 दिवसांसाठी मिळत होता, तो आता आपल्याला 365 दिवसांसाठी मिळेल.
ह्याचा अर्थ जर आपण कोणता डाटा पॅक घेतला असेल आणि तो आपण ९० दिवसांच्या आत पुर्णपणे वापरु शकले नाही आणि त्यातच त्याचा कालावधी संपून जायचा ही समस्या आता उद्भवणार नाही. कारण ह्याची कालमर्यादा आता ३६५ दिवसांची केली आहे. ह्याचाच अर्थ तुमचा डाटा पॅक आता १ वर्षाआधी संपणार नाही, ज्यामुळे आता तुम्ही तुमचा डाटा पॅक पुर्णपणे वापरु शकाल. त्याचबरोबर ह्याचा फायदा तुम्हाला लाइफलाँग कॉलिंगसाठीही होणार आहे.
हेदेखील वाचा – पावसाळ्याच्या दिवसात खूपच फायद्याचे ठरतील हे वॉटरप्रूफ स्मार्टफोन्स
TRAI ने आपल्या टेलिकॉम कंज्यूमर्स प्रोटेक्शन रेग्युलेशन्समध्ये १० वे संशोधन केले आहे. ज्यात आता आपल्याला आपल्या डाटा पॅकचा कालावधी १ वर्षापर्यंत मिळेल.
हा लॉन्गर डाटा प्लान त्या सर्व लोकांसाठी एक चांगली संधी आहे, जो जास्तीत जास्त इंटरनेट डाटा वापरतात. आपल्या देशात असेही काही लोक आहेत जे वायफायच्या माध्यमातून केवळ व्हिडियो पाहतात आणि आपल्या डाटा पॅकला केवळ फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसाठी वापरतात.
हेदेखील वाचा – BSNL ने आपल्या लँडलाइन यूजर्ससाठी केली मोफत अनलिमिटेड कॉलिंगची घोषणा
हेदेखील वाचा – मुंबईच्या ७ रेल्वे स्टेशन्सवर सुरु झाली मोफत वायफाय सेवा