चक्क नेटवर्क नसताना करता येईल कॉलिंग ? फक्त ‘ही’ सेटिंग बदला

Updated on 17-Apr-2023
HIGHLIGHTS

नेटवर्क नसतानाही WiFi कॉलिंग करता येईल.

ही सुविधा नेटवर्क इशू असलेल्या क्षेत्रात उपयुक्त

JIO आणि AIRTEL युजर्सना या फीचरचा लाभ कसा घेता येईल?

स्मार्टफोनमध्ये नेटवर्क नसताना कॉलिंग करणे शक्य आहे का ? होय, असे करणे शक्य आहे म्हटल्यास तुमचा विश्वास बसणार आहे. पण टेक्नॉलॉजी आता बरीच पुढे गेली आहे. त्यामुळे नेटवर्क नसताना कॉलिंग करणेदेखील आता अशक्य राहिलेले नाही. आम्ही तुम्हाला एक विशेष माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही कुठेही सहज कॉलिंग करू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला WiFi ची गरज नक्की असेल. तुमच्या फोनमध्ये वायफाय कनेक्ट असणे गरजेचे आहे. 

JIO युजर्ससाठी WiFi कॉलिंग

क्वचितच असे काही लोक असतील ज्यांना या फीचर्सबद्दल माहिती असेल. कमी नेटवर्क असणाऱ्या क्षेत्रात JIO आपल्या युजर्सना ही सुविधा देतो. कॉलिंग तुम्ही तुमच्या वायफायच्या मदतीने करू शकता. यासाठी तुम्हाला स्मार्टफोनमध्ये काही सेटिंग्स कराव्या लागतील. 

– जर तुम्ही आयफोन युजर असाल तर तुम्हाला सेटिंग्समध्ये जाऊन मोबाईल डेटाच्या ऑप्शनवर जावे लागेल.

–  येथे तुम्हाला 'वायफाय कॉलिंग'चा पर्याय दिसेल.

– हा पर्याय तुम्हाला Enable करायचा आहे.      

– हा पर्याय अनेबल केल्यावर तुम्हला वायफाय कॉलिंगचा ऑप्शन सहज मिळतो. 

AIRTEL  युजर्ससाठी WiFi कॉलिंग

AIRTEL युजर्सदेखील वायफाय कॉलिंग करू शकतात. मात्र, हे फिचर केवळ त्या युजर्सना मिळणार आहे. ज्यांच्याकडे AIRTEL FIBER CONNECTION आहे. यामध्ये तुम्हाला वायफाय कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. विशेषतः हे त्या युजर्ससाठी आहे, जे नेटवर्क प्रॉब्लम असलेल्या क्षेत्रात असतात. तुम्हाला यासाठी देखील वरील प्रक्रियेची मदत घ्यावी लागेल.   

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :