रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच AGM 2022 झाली. या बैठकीत Jio 5G सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. Jio 5G सेवेसोबतच कंपनीने Jio AirFiber डिव्हाईस लाँच करण्याची घोषणा केली आहे. या उपकरणाच्या मदतीने, अल्ट्रा फास्ट स्पीड 5G इंटरनेट कनेक्टिव्हिटी ऑफिसमध्ये आणि घरात वापरली जाऊ शकते. वापरकर्त्यांना AirFiberद्वारे वायरलेस ब्रॉडबँड सेवा मिळेल. हे गाव आणि ग्रामीण भागासाठी गेम चेंजर डिव्हाइस सिद्ध होऊ शकते.
हे सुद्धा वाचा : फॅमिली मेम्बर्ससाठी AIRTEL सर्वोत्तम प्लॅन्स, 250GB पर्यंत डेटा, Amazon Prime आणि Hotstar सोबत Netflix देखील फ्री
वायरलेस Jio AirFiber डिव्हाइस कंपनीने पूर्वी लाँच केलेल्या Wi-Fi डिव्हाइस JioFi चे ऍडव्हान्स वर्जन म्हणून सादर केले आहे. या ब्रॉडबँड सेवेमुळे 2 Gbps पर्यंत अल्ट्रा फास्ट स्पीडवर इंटरनेट उपलब्ध होईल. हे वायरलेस उपकरण घराबरोबरच कार्यालयासाठीही वापरता येणार आहे. हॉटस्पॉट उपकरण Jio AirFiber कंप्यूटर, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट तसेच इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) उपकरणांशी सहजपणे कनेक्ट केले जाऊ शकते.
Jio AirFiber डिव्हाइससह, इंटरनेटचा वापर संपूर्ण घरामध्ये एकाच अल्ट्रा-फास्ट वेगाने केला जाऊ शकतो. या डिव्हाईससह, हाय एंड गेमिंग आणि उच्च दर्जाचे व्हिडिओ देखील कोणत्याही अडथड्याविना प्ले केले जाऊ शकतात. कंपनीचा दावा आहे की वापरकर्त्यांना या डिव्हाइसमधून एंड-टू-एंड ब्रॉडबँड (वायरलेस) सोल्यूशन मिळेल. म्हणजेच हाय स्पीड इंटरनेटसाठी तुम्हाला इतर कोणत्याही उपकरणाची गरज नाही. ही एक पोर्टेबल वायरलेस ब्रॉडबँड सेवा असणार आहे, जी तुम्ही सहजपणे सेटअप आणि वापरू शकता.