सध्या टेलिकॉम बाजारात सर्व कंपन्या रोज नवे प्लान्स आणि ऑफर्स घेऊन येत आहेत आणि यात भारत संचार निगम लिमिटेडचा समावेश आहे. गेल्या काही आठवड्यांत आम्ही BSNL च्या प्रीपेड प्लान्स सोबतच ब्रॉडबँड प्लान्स मध्ये पण अनेक बदल बघितले आहेत. पण आज ज्या प्लान बद्दल आम्ही बोलणार आहोत तो काही जुना प्लान नाही तर बीएसएनएल चा हा Rs 599 चा नवीन प्लान ऍक्टिवेट केल्यानंतर यूजर्स आपल्या चालू प्लानची वैधता वाढवू शकतात.
बीएसएनएल चा हा Rs 599 चा प्रीपेड प्लान वॅलिडिटी वाढवणाऱ्या किंवा माइग्रेट करणाऱ्या यूजर्ससाठी आहे. BSNL प्रीपेड यूजर्स या प्लानच्या माध्यमातून आपल्या एखाद्या प्लानची वैधता 180 दिवसांपर्यंत वाढवू शकता. या प्लानच्या माध्यमातून यूजर्सच्या प्लानची वैधता सहा महिन्यनांपर्यंत वाढते आणि सोबत यूजर्सना फ्री लोकल, STD आणि रोमिंग कॉल्सचा लाभ पण मिळतो. पण हा प्लान दिल्ली किंवा मुंबई साठी नाही कारण बीएसएनएल या शारांत ऑपरेट करत नाही. जर तुमचा चालू प्लान एक्सपायर होणार असेल आणि तुम्ही याची वैधता वाढवू इच्छित असाल तर हा रिचार्ज प्लान ऍक्टिव्ह करू शकता.
जर आपण प्रीपेड पोर्टफोलियो वर नजर टाकली तर लक्षात येईल कि कंपनीने म्हणजे BSNL ने Rs 666 च्या सिक्सर प्लानची वैधता कंपनीने वाढवली आहे, विशेष म्हणजे या प्लान मध्ये तुम्हाला 3.7GB डेली डेटा मिळत आहे, तसेच यात तुम्हाला FUP लिमिट पण मिळत आहे, जी पूर्ण झाल्यांनंतर तुम्हाला फक्त 40Kbps चा स्पीडच मिळणार आहे. तसेच या प्लान मध्ये तुम्हाला 100 SMS डेली मिळतील, तसेच यात तुम्हाला मुंबई आणि दिल्ली सर्कल्स व्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा पण मिळत आहे.
या प्लान मध्ये तुम्हाला आता फक्त 122 दिवसांची वैधता मिळत होती, पण आता या प्लान सोबत तुम्हाला कंपनीने बदल केल्यामुळे 134 दिवसांची वैधता मिळत आहे, हेदेखील लक्षात घ्या कि काही दिवसांपूर्वी या प्लानची वैधता कमी पण करण्यात आली होती, या प्लानची आधी वैधता 129 दिवसांची होती पण ती कमी करून 122 करण्यात आली होती.