वापरकर्ते VI च्या 5G नेटवर्कच्या लाँचची प्रतीक्षा करत आहे. अलीकडेच,VI ने दोन स्वस्त प्लॅन्सची वैधता कमी केली आहे, त्यामुळे ग्राहक जरा नाराज झाले आहेत. दरम्यान, नुकतेच VI ने तीन नवीन प्लॅन्स लाँच केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्लॅन्सची सुरुवातीची किंमत केवळ 17 रुपये आहे आणि यामध्ये अमर्यादित डेटाचा लाभ मिळणार आहे. बघुयात तपशील –
या प्लॅनमध्ये कंपनी रात्री 12 ते सकाळी 6 वाजतापर्यंत अमर्यादित इंटरनेट डेटा देत आहे. हा प्लॅन 1 दिवसाच्या वैधतेसह येतो. मात्र, यामध्ये तुम्हाला इतर कोणत्याही सेवा किंवा आउटगोइंग SMS मिळणार नाहीत. ज्या ग्राहकांना इतर प्लॅनमध्ये अमर्यादित डेटाचा पर्याय मिळत नाही, त्यांच्यासाठी हा प्लॅन आहे. कंपनीने हा प्लॅन त्यांच्या वॉचर्स लिस्टिंगमध्ये लाँच केला आहे.
हा प्लॅन एक प्रीपेड व्हाउचर आहे, जो वरील प्लॅनप्रमाणेच लाभ देतो. परंतु या प्लॅनमध्ये युजर्सना 7 दिवसांची वैधता मिळणार आहे. हा पॅक 168 तासांसाठी वैध असेल, अशी माहिती VI अधिकृत साईटवरून मिळते. मात्र, यामध्ये आउटगोइंग SMS किंवा इतर कोणतेही फायदे मिळणार नाहीत.
VI च्या 1,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, दररोज 1.5GB डेटा आणि दररोज 100SMS चा लाभ मिळेल. डेटा मर्यादा संपल्यास स्पीड 64 Kbit प्रति सेकंद इतका कमी होणार आहे. त्याबरोबरच, महत्त्वाचे म्हणजे या प्लॅनची वैधता 250 दिवस म्हणजे सुमारे 8 महिने असणार आहे.
वरील प्लॅन्सबाबत अधिक माहितीसाठी VI च्या अधिकृत साईटला भेट द्या.