तुम्हाला तर माहितीच आहे की टेलीकॉम वॉर थांबता थांबत नाही आहे. प्रत्येक कंपनी दुसऱ्या कंपनी पेक्षा चांगला प्लान आपल्या यूजर्सना देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. काही कंपन्या आपल्या प्लान मध्ये बदल करत आहेत तर काही कंपन्या नवीन प्लान लॉन्च करून यूजर्सना आकर्षित करू पाहत आहेत. वोडाफोन पण असाच काहीसा विचार करत आहे. कंपनीने आपल्या Rs 199 आणि Rs 399 मध्ये येणाऱ्या प्लान्स मध्ये काही निवडक सर्कल्समध्ये बदल केले आहेत.
टेलीकॉमटॉक च्या एका बातमीनुसार, वोडाफोनने आपल्या या दोन्ही रिचार्ज प्रीपेड प्लान्स म्हणजे Rs 199 आणि Rs 399 मध्ये येणाऱ्या प्लान्स मध्ये 100MB अतिरिक्त डेटा आपल्या यूजर्सना देण्याची घोषणा केली आहे. आता हे दोन्ही प्लान्स तुम्हाला 1.5GB डेटा सह मिळतील. विशेष म्हणजे एयरटेल ने पण आपल्या Rs 199 मध्ये येणाऱ्या प्लान मध्ये असेच काही बदल केले आहेत. एयरटेलच्या पण Rs 199 मध्ये येणाऱ्या प्लान मध्ये आता तुम्हाला जास्त डेटा मिळत आहे.
वोडाफोनच्या Rs 199 मध्ये येणाऱ्या प्लान मध्ये आता तुम्हाला 1.5GB डेटा दिला जात आहे, या प्लान मध्ये तुम्हाला एकूण 42GB डेटा मिळत आहे, आणि या प्लानची वैधता एकूण 28 दिवसांची आहे. तसेच या प्लान मध्ये तुम्हाला जे काही आधी पासून मिळत होते ते आताही मिळत आहे. याचा अर्थ असा की Rs 199 मध्ये येणाऱ्या वोडाफोनच्या प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये अजूनही तुम्हाला कॉलिंग आणि SMS ची सुविधा मिळत आहे.
तसेच जर Rs 399 मध्ये येणाऱ्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्लान मध्ये तुम्हाला आता 1.5GB डेली डेटा मिळत आहे. या प्लानची वैधता एकूण 84 दिवसांची आहे. हा काही निवडक यूजर्ससाठीच आहे. पण याआधी या प्रीपेड रिचार्ज प्लान मध्ये तुम्हाला 1.4GB डेटा फक्त 70 दिवसांसाठी मिळत होता. याचा अर्थ असा आहे की या प्लान मध्ये तुम्हाला वैधतेच्या बाबतीतही मोठा बदल मिळणार आहे, पण डेटाच्या बाबतीती हा प्लान अजूनही मागेच आहे असे आपण म्हणू शकतो.