खास आहे नवीन VODAFONE RED PLAN, मिळत आहेत 5 कनेक्शन, 200GB डेटा अजूनही खूप काही
टेलीकॉम कंपनी वोडाफोन ने अलीकडेच आपल्या Vodafone RED Plan मध्ये बदल केले आहेत. याअंतर्गत वोडाफोन अनेक नवीन मल्टीपल कनेक्शंस वाले प्लान घेऊन आला आहे. या नवीन vodafone multiple plan ची किंमत 598 रुपयांपासून सुरु होत आहे.
वोडाफोनच्या या RED Postpaid प्लान मध्ये बदल करत यूजर्सना मल्टीपल कनेक्शंस ऑफर केले जात आहेत म्हणजे वोडाफोन RED पोस्टपेड सब्सक्राइबर्स जर संपूर्ण कुटुंबासाठी एखादा प्लान घेऊ इच्छित असतील तर ते वोडाफोनच्या या नवीन प्लान वर एक नजर टाकू शकतात. यूजर्स साठी तीन नवीन मल्टीपल कनेक्शन लॉन्च केले गेले आहेत ज्यात 598 रुपये वाल्या प्लान सह 749 रुपये आणि 999 रुपयांच्या प्लानचा समावेश आहे.
Vodafone नुसार ते 899 रुपयांच्या Vodafone RED प्लान मध्ये पण मल्टीपल कनेक्शन उपलब्ध करणार आहेत. तसेच 598 रुपयांच्या Vodafone RED प्लान अंतर्गत सब्सक्राइबर्सना एक ऍडिशनल कनेक्शन मिळेल ज्यात दुसऱ्या यूजरला 30GB 4G किंवा 3G डेटा मिळेल. तसेच जर तुम्ही प्राइमरी यूजर असाल तर तुम्हाला 50 GB 4G किंवा 3G डेटा मिळेल. खास बाब अशी कि वोडाफोनचे हे सर्व मल्टीपल कनेक्शन "अनलिमिटेड वॉइस कॉलिंग" सह येतात.
सोबतच 749 रुपयांच्या प्लान मध्ये प्राइमरी यूजर सह दोन मल्टीपल कनेक्शन दिले जातील. या प्लान मध्ये पण अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचे फायदे दिले जात आहेत. प्लान मध्ये पण दोन यूजर्सना 30GB डेटा आणि प्राइमरी यूजरला 60GB डेटा मिळेल. तसेच 899 रुपयांच्या Vodafone RED पोस्टपेड प्लान मध्ये तीन ऍडिशनल कनेक्शन मिळतील ज्यात तिन्ही ऍडिशनल यूजर्सना 30GB डेटा मिळेल. सोबतच प्राइमरी यूजर्सना 70GB डेटा दिला जाईल.
999 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर वोडाफोन 4 ऍडिशनल कनेक्शन देईल ज्यात प्राइमरी यूजरला 80 GB डेटा आणि एड-ऑन कनेक्शंस वाल्या यूजर्सना 30 GB डेटा दिला जाईल. यूजर्सना यात पण unlimited local, STD आणि national roaming calls मिळतील. सोबतच Vodafone आपल्या यूजर्सना एका वर्षाचे फ्री Amazon Prime subscription पण देत आहे.
मिळतील हे FREE SUBSCRIPTIONS
वोडाफोनच्या या नवीन प्लान सोबत सब्सक्राइबर्सना Live TV, premium content on ZEE5, Sony LIV, Shemaroo, Hoi Choi, Sun NXT, आणि Alt Balaji चे सब्सक्रिप्शन पण फ्री मिळेल. सोबतच वोडाफोन या प्लानच्या प्राइमरी यूजर्सना एक वर्षाचे मोबाईल इंश्योरेंस पण देत आहे जे स्मार्टफोनला कोणत्याही प्रकारच्या डॅमेजला कवर करते ज्यात लिक्विड किंवा फिजिकल डॅमेज चा पण समावेश आहे.