वोडाफोन ने सादर केला प्लान, दररोज 56 दिवसांसाठी मिळणार 1GB डाटा

Updated on 07-Mar-2018
HIGHLIGHTS

या प्लान ची किंमत Rs. 299 आहे आणि हा एक प्रीपेड प्लान आहे.

वोडाफोन ने आता बाजारात एक नवीन प्लान सादर केला आहे. या प्लान ची किंमत Rs. 299 आहे आणि याची विशेषता ही आहे की यात कंपनी 56 दिवसांची वैधता देत आहे. म्हणजे हा एक मोठी वैधता असलेला प्लान आहे. 
जास्त वैधते सोबत कंपनी यात दररोज 1GB डाटा पण देत आहे. ज्यामुळे यूजर्सना एकूण 56GB डाटा मिळेल. 
 
या सोबत कंपनी या प्लान मध्ये अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग ची सुविधा पण देत आहे. तसेच यात रोज 100 SMS करण्याची सुविधा पण मिळत आहे. पण रोज फक्त 250 मिनिटे कॉल्स केले जाऊ शकतात आणि एका आठवड्यात 1000 मिनिटे कॉलिंग केली जाऊ शकते. 
Telecom Talk च्या रिपोर्ट नुसार, सध्यातरी हा प्लान फक्त मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सर्कल मधील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. पण अंदाज लावला जात आहे की, हा प्लान आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मध्ये पण लवकरच सादर होईल.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :