अलीकडेच टेलीकॉम ऑपरेटर Vodafone India ने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन प्रीपेड प्लान भारतात सादर केला आहे. हा नवीन प्लान 229 रुपयांमध्ये येतो. या नवीन प्लान मध्ये यूजर्सची गरज बघून कंपनीने संपूर्ण पॅकेज उपलब्ध केला आहे ज्यात डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, रोमिंग कॉल्स, SMS ची सुविधा दिली जात आहे.
यूजर्सना या प्लान अंतर्गत रोज 2GB डेटा दिला जाईल. सोबतच UNLIMITED VOICE CALL सह यूजर्सना रोज 100 SMS ची सुविधा पण मिळत आहे. इतकेच नव्हे तर कंपनीने प्लान मध्ये 2GB 4G/ 3G डेटा रोज देण्यात येत आहे. सोबत अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्सची सुविधा पण मिळत आहे. या प्लानची वॅलिडिटी 28 दिवस आहे.
Telecom Talk च्या एका रिपोर्ट नुसार VODAFONE कंपनीने आता प्लान काही लिमिटेड सर्किल मध्ये सादर केला आहे. यात Delhi NCR, Mumbai, आणि Rajasthan यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे वोडाफोनचा एक प्लान 199 रुपयांचा पण आहे ज्यात कंपनी अनलिमिटेड वॉयस कॉल, 100 SMS डेली आणि 1.5GB डेटा रोज देत आहे. हा प्लान पण 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो.
विशेष म्हणजे वोडाफोनने युजर्सना आकर्षित करण्यासाठी प्रीपेड सिमची होम डिलिव्हरी सुरू केली आहे. अशीच Reliance Jio ने पण ही सर्विस भारतात सुरू केली होती. याचा अर्थ असा की आता तुम्ही घर बसल्या आपला Vodafone प्रीपेड सिम मिळवू शकता. जर तुम्ही तुमचा सिम आर्डर करू इच्छित असाल तर तुम्हाला त्यासाठी Vodafone India च्या वेबसाइट वर लॉगइन करावे लागेल. नंतर प्रीपेड अकाउंट सेक्शन मध्ये जाऊन सिम डिलीवरीच्या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.