फक्त RS 20 मध्ये आला VODAFONE चा नवीन सर्वात स्वस्त प्लान, जाणून घ्या फायदे
प्लानची वैधता 28 दिवस
वैधता वाढवण्याचे काम करेल हा प्लान
मिळेल फुल टॉक टाइम
Vodafone ने आपल्या पोर्टफोलियो मध्ये मिनिमम प्रीपेड रिचार्ज प्लान्स सादर केल्यानंतर किफायती प्रीपेड प्लान्स हटवले होते. या प्लान्स जागी Rs 24 किंवा Rs 35 चे प्रीपेड रिचार्ज प्लान्स आले होते आणि आता कंपनीने एक नवीन सर्वात स्वस्त प्लान सादर केला आहे जो बजेट मध्ये प्लानची वैधता वाढवण्याचे काम करेल.
VODAFONE RS 20 PLAN
TelecomTalk च्या रिपोर्ट नुसार, Rs 20 च्या प्रीपेड प्लान मध्ये फुल टॉक टाइम मिळतो आणि या प्लानची वैधता 28 दिवस ठेवण्यात आली आहे. या प्लानच्या माध्यमातून तुम्ही तुमची वैधता वाढवू शकता आणि इनकमिंग कॉल्सचा लाभ घेऊ शकता. हा प्लान सध्या निवडक सर्कल्स मधेच उपलब्ध आहे.
अशाप्रकारचे इतर टॉक टाइम प्लान्स पण आहेत. Rs 10 च्या प्लान मध्ये Rs 7.47 टॉक टाइम मिळतो तर Rs 50 आणि Rs 100 च्या प्लान्स बद्दल बोलायचे तर या प्लान्स मध्ये क्रमश: Rs 39.37 आणि Rs 100 चा टॉक टाइम मिळतो. लक्षात ठेवा कि हे प्लान्स मर्यादित वैधतेसह येत नाहीत तर टॉप-अप सह आते येतात. या प्लानची वैधता चालू प्लान एवढी असते.
VODAFONE RS 24 PLAN
Rs 24 मध्ये येणार हा प्रीपेड प्लान वोडाफोन आणि आईडिया दोन्ही यूजर्स साठी उपलब्ध आहे. हा सर्व प्रीपेड यूजर्स साठी ओपन मार्केट प्लान आहे आणि वोडाफोन तसेच आईडियाच्या सर्व सर्कल मध्ये मान्य आहे. हा प्लान खासकरून त्या यूजर्स साठी आहे ज्यांना फक्त आपल्या अकाउंटची वैधता वाढवायची आहे आणि कोणताही वॉयस आणि डेटा बेनिफिट नको. या रिचार्जने 28 दिवसांची वैधता वाढ मिळते.
या प्लानच्या फ्री कॉलिंग बेनिफिट बद्दल बोलायचे झाले तर वोडाफोन यूजर्सना 100 ऑन-नेट नाईट कॉलिंग मिनट्स मिळत आहेत ज्यांचा वापर रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत केला जाऊ शकतो. ऑन-नेट कॉलिंगचा अर्थ इथे असा कि कि वोडाफोन ते वोडाफोन किंवा आईडिया ते आईडिया. इतर कॉल्स, लोकल आणि STD चा दर 2.5 पैसे प्रति सेकंड होईल. डेटा यूसेज बद्दल बोलायचे तर प्रति 10KB 4 पैसे, म्हणजे प्रति MB 4 रुपयांचा चार्ज द्यावा लागेल. रोमिंग मध्ये डेटा दर प्रति 10KB 10 पैसे होईल म्हणजे प्रति MB 10 रूपये होईल.