Vodafone ने या ठिकाणी लॉन्च केली आपली धमाकेदार सेवा, यूजर्सना मिळणार आहे मोठा फायदा

Updated on 06-Apr-2018
HIGHLIGHTS

Vodafone ने लखनऊ, कानपुर, वाराणसी, गोरखपुर सहित काही शहरांमध्ये आपली VoLTE सर्विस लॉन्च केली आहे.

Vodafone ने उत्तर प्रदेश च्या पूर्व सर्कल साठी आपली वॉइस ओवर LTE (VoLTE) सर्विस जारी केली आहे. नवीन VoLTE सर्विस सुरू होणाऱ्या शहरांमध्ये लखनऊ, कानपुर, वाराणसी, गोरखपुर, इलाहबाद, फैजाबाद व्यतिरिक्त 26,000 गावे आणि शहरे आहेत. Vodafone यूजर्स आता VoLTE चा वापर करून HD क्वालिटी कॉल्स चा फायदा घेऊ शकतील. 

Vodafone SuperNetTM4G यूजर्स Vodafone ची VoLTE सर्विस कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना एक्सेस करू शकतील आणि सर्व कॉल्स चालू प्लान किंवा पॅक बेनेफिट नुसार बिल केले जातील, अशा प्रकारे Vodafone च्या डाटा स्ट्रॉंग नेटवर्क चा हा सर्वश्रेष्ठ अनुभव असेल. 
Vodafone इंडिया चे UP East बिजनेस हेड Nipun Sharma ने Vodafone VoLTE सर्विस ची घोषणा करताना सांगितले, "आम्ही आमच्या नेटवर्क ला वाढवण्यासाठी आणि अपग्रेड करण्यासाठी महत्वपूर्ण गुंतवणूक करत आहोत ज्यामुळे आम्ही आमच्या मौल्यवान ग्राहकांना चांगल्या सेवेचा अनुभव आणि उत्तम कनेक्टिविटी देऊ शकु. आम्हाला आनंद आहे की Vodafone उत्तर प्रदेश च्या पूर्व सर्कल मध्ये 26000 पेक्षा जास्त गाव आणि शहरांमध्ये आपली VoLTE सर्विस लॉन्च करत आहे."

काही दिवसांपूर्वी Vodafone ने Rs. 21 चा नवीन प्लान सादर केला होता ज्यात यूजर्सना अनलिमिटेड 3G/4G इंटरनेट डाटा मिळत आहे आणि हा प्लान कंपनी ने खासकरून प्रीपेड यूजर्स साठी सादर केला आहे. या प्लान बद्दल सविस्तर बोलायचे झाले तर या प्लान ची वैधता फक्त एक दिवस आहे. सोबतच या प्लान मध्ये तुम्हाला फक्त एक तासासाठी एवढ इंटरनेट मिळत आहे.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :