तीन टेलिकॉम ऑपरेटर्स रिलायंस जियो, वोडाफोन आईडिया आणि भारती एयरटेल मध्ये सतत टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये एकमेकांना मात देण्यासाठी नवीन प्रयत्न चालू असतात. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार यावेळी वोडाफोन ने आपल्या प्रीपेड प्लान्स मध्ये वाढ करत दोन नवीन प्लान्स लॉन्च केले आहेत जे Rs 205 आणि 225 मध्ये आले आहेत.
Vodafone चा पहिला नवीन प्रीपेड प्लान Rs 205 मध्ये येतो जो एक बोनस कार्ड प्रीपेड प्लान आहे. या प्लान मध्ये टॉक टाइमचा लाभ मिळत नाही पण हा फ्री कॉल्स आणि डेटा ऑफर करतो. या प्लान मध्ये सब्सक्राइबर्सना 2GB डेटा, अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स मिळतात. तसेच संपूर्ण वैधते साठी यूजर्स 600 फ्री SMS वापरू शकतात आणि प्लानची वैधता 35 दिवस ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर यूजर्स वोडाफोन प्ले ऍप वर फ्री लाइव टीवी, फिल्म्स इत्यादी बघू शकतात.
Rs 225 चा नवीन प्रीपेड प्लान पण एक बोनस कार्डच आहे आणि या रिचार्ज मध्ये पण आधीच्या रिचार्ज प्रमाणे समान लाभ मिळतात. Rs 225 मध्ये येणाऱ्या वोडाफोनच्या या प्लानची वैधता 48 दिवस आहे आणि रिचार्ज मध्ये टॉक टाइम बेनिफिट मिळत नाहीत. Vodafone च्या या रिचार्ज प्लान मध्ये फ्री लोकल, STD आणि रोमिंग कॉल मिळतात आणि त्याचबरोबर यूजर्स संपूर्ण वैधतेसाठी 4GB डेटाचा वापर करू शकतात. या प्लान मध्ये पण यूजर्सना एकूण कालावधीसाठी 600 SMS दिले जात आहेत आणि यूजर्स Vodafone Play ऍप वर लाइव टीवी, फिल्म्स इत्यादी बघू शकतात.