VODAFONE ने लॉन्च केला RS 599 मध्ये येणारा प्रीपेड प्लान, अनलिमिटेड कॉल सोबत मिळत आहे डेटाच डेटा
Vodafone ने आपला एक नवीन लॉन्ग टर्म प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे, हा प्लान कंपनीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी लॉन्च केला आहे. हा प्लान वोडाफोन ने Rs 599 मध्ये लॉन्च केला आहे आणि या प्लानची वैधता 180 दिवस आहे. म्हणजे तुम्हाला हा प्लान 6 महिन्याच्या वैधतेसह मिळणार आहे.
तसेच या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. तसेच यात तुम्हाला कोणतीही FUP लिमिट मिळत नाही. त्याचबरोबर या प्लान मध्ये तुम्हाला एक 1800 लोकल आणि नॅशनल SMS मिळत आहेत, याचा अर्थ असा कि तुम्हाला 180 दिवसांसाठी 1800 SMS पण मिळणार आहेत.
टेलीकॉम टॉकचा एक रिपोर्ट पाहता हा प्लान Rs 599 मध्ये लॉन्च केला आहे आणि यात तुम्हाला 6GB 3G/4G डेटा मिळत आहे. पण जर तुम्ही हा डेटा वापरला तर तुम्हाला 50 पैसे प्रति MB च्या हिशोबाने पैसे द्यावे लागतील, अर्थात् तुम्ही 6GB डेटा नंतर डेटा वापरला तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. हा प्लान असा वाटत आहे कि वोडाफोनचा Rs 599 वाला प्लान एयरटेल च्या Rs 597 मध्ये येणार्या प्लानला टक्कर देण्यासाठी लॉन्च केला गेला आहे.
अलिकडेच वोडाफोन ने अजून एक प्लान पण लॉन्च केला होता. हा नवीन प्लान आहे 229 रुपयांमध्ये येतो. या नवीन प्लान मध्ये यूजर्सची गरज बघून कंपनी ने संपूर्ण पॅकेज उपलब्ध केला आहे ज्यात डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, रोमिंग कॉल्स, SMS ची सुविधा दिली जात आहे.
यूजर्सना या प्लान अंतर्गत रोज 2GB डेटा दिला जाईल. सोबत UNLIMITED VOICE CALL सह यूजर्सना रोज 100 SMS ची सुविधा पण मिळत आहे. इतकेच नव्हे तर कंपनी ने प्लान मध्ये 2GB 4G/ 3G चा रोजचा डेटा पण देण्यात आला आहे. सोबत अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्सची सुविधा पण मिळत आहे. या प्लानची वॅलिडिटी 28 divas ठेवण्यात आली आहे.
Telecom Talk च्या एका रिपोर्ट नुसार VODAFONE कंपनी ने आता हा प्लान काही लिमिटेड सर्कल मध्ये सादर केला आहे. यात Delhi NCR, Mumbai आणि Rajasthan यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे वोडाफोनचा एक प्लान 199 रुपयांचा पण आहे ज्यात कंपनी अनलिमिटेड वॉयस कॉल, 100 SMS डेली आणि 1.5GB डेटा रोज देत आहे. हा प्लान पण 28 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो.