वोडाफोन ने एक वर्षाच्या वैधतेसाठी सादर केला नवीन प्रीपेड प्लान, किंमत Rs 1,499

वोडाफोन ने एक वर्षाच्या वैधतेसाठी सादर केला नवीन प्रीपेड प्लान, किंमत Rs 1,499
HIGHLIGHTS

वोडाफोनच्या नव्या Rs 1,499 प्रीपेड प्लान मध्ये 365 दिवसांची वैधता दिली जात आहे आणि प्लान अंतर्गत युजर्सना अनलिमिटेड कॉल्स, वोडाफोन प्ले सब्सक्रिप्शन आणि अनलिमिटेड नॅशनल रोमिंग सारखे फायदे मिळत आहेत.

महत्वाचे मुद्दे

  • वोडाफोन ने Rs 1,499 मध्ये लॉन्च केला नवीन प्लान
  • या प्लानची वैधता आहे 1 वर्षाची
  • युजर्सना प्रतिदिन मिळत आहे 1GB डेटा

वोडाफोन इंडिया ने आपला नवीन प्रीपेड प्लान सादर केला आहे ज्याची किंमत Rs 1,499 ठेवण्यात आली आहे. हा प्लान कंपनीने 365 दिवसांच्या वैधतेसह लॉन्च केला आहे आणि यात युजर्सना अनलिमिटेड कॉल्स, वोडाफोन प्ले सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड नॅशनल रोमिंग आणि प्रतिदिन 1GB डेटा मिळत आहे. प्लान अंतर्गत युजर्सना प्रतिदिन 100 SMS पण मिळत आहेत. डेटा लिमिट संपताच युजर्सना प्रति MB 50 पैसे चार्ज द्यावा लागेल.

Vodafone चा हा प्लान रिलायंस जियोच्या Rs 1,699 प्लानला टक्कर देईल. जियोच्या या प्लान मध्ये उपभोक्त्यांना अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉल्स आणि प्रतिदिन 100 लोकल आणि नॅशनल SMS मिळत आहेत. या प्लान मध्ये कॉल्ससाठी कोणतीही FUP लिमिट नाही. जियोच्या या प्लान मध्ये JioTV, JioMovies, JioSaavn म्यूजिक आणि अनेक ऍप्सचा फ्री ऍक्सेस पण मिळत आहे. डेटा बद्दल बोलायचे तर युजर्सना प्रतिदिन 1.5GB डेटा मिळत आहे. डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेट स्पीड 64Kbps होतो.

डिसेंबर 2018 मध्ये एयरटेल ने आपल्या Rs 448 प्लान मध्ये बदल केले होते आणि डेटा बेनिफिट प्रतिदिन 1.4GB ऐवजी 1.5GB केले होते आणि या प्लान मध्ये डेटा व्यतिरिक्त, अनलिमिटेड कॉल्स आणि प्रतिदिन 100 SMS मिळत आहेत आणि या प्लानची वैधता 82 दिवसांची आहे. याच काळात आईडिया ने पण आपल्या Rs 392 च्या प्रीपेड प्लान मध्ये बदल केले आहेत. आईडियाच्या या प्लान मध्ये आता युजर्सना प्रतिदिन 1.4GB डेटा मिळत आहे आणि याची वैधता 54 दिवसांवरून 60 दिवस करण्यात आली आहे. या रिचार्ज प्लान मध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन 100 SMS मिळत आहेत.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo