भारतात टेलिकॉम ऑपरेटर्स मधील स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्यामुळे प्रीपेड यूजर्सना याचा खूप फायदा होत आहे. गेल्या आठवड्यात एयरटेल ने आपले Rs 100 आणि Rs 500 चे टॉप-अप प्रीपेड रिचार्ज प्लान्स सादर केले होते जे लाइफटाइम वैधतेसह येत आहेत. आता वोडाफोन ने पण आपले Rs 50, Rs 100 आणि Rs 500 चे टॉप-अप रिचार्ज प्लान्स सादर केले आहेत जे एयरटेलपेक्षा जास्त चांगल्या बेनेफिट्स सह येत आहेत.
Rs 50 च्या टॉप-अप रिचार्ज प्लान पासून सुरवात करायची झाल्यास हा Rs 39.37 चा टॉक टाइम ऑफर करतो आणि याची आउटगोइंग वैधता 28 दिवस आहे. जर आउटगोइंग वैधता संपल्यानंतर पण काही बॅलेन्स उरलाच तर हा बॅलेन्स पुढील रिचार्ज मध्ये कॅरी फॉरवर्ड केला जाईल. उदाहरणार्थ जर तुम्ही Rs 1,499 चा रिचार्ज केला आहे जो 365 दिवस वैधता ऑफर करतो तर Rs 39.37 चा टॉक टाइम 365 दिवसांसाठी वैध असेल, फक्त 28 दिवसांसाठी नाही.
पुढील टॉप-अप रिचार्ज Rs 100 पासून सुरु होत आहे जो Rs 100 चा टॉक टाइम ऑफर करतो आणि 28 दिवस आउटगोइंग वैधता ऑफर करतो, तर Rs 500 च्या टॉप-अप मध्ये Rs 500 टॉक टाइम सह 84 दिवस वैधता मिळते. एकंदरीत पाहता तुमच्या टॉप-अप रिचार्ज प्लानची आउटगोइंग वैधता तुमच्या सध्याच्या प्रीपेड प्लानच्या वैधते इतकी असेवळ.
वोडाफोनच्या Rs 10 च्या टॉप-अप रिचार्ज मध्ये यूजर्सना Rs 7.47 चा टॉक टाइम, Rs 1,000 मध्ये Rs 1,000 चा फुल टॉक टाइम आणि Rs 5,000 च्या टॉप-अप रिचार्ज मध्ये Rs 5,000 चा फुल टॉक टाइम मिळत आहे.
Airtel च्या Rs 100 च्या टॉप-अप रिचार्ज मध्ये Rs 81.75 चा टॉक टाइम मिळत आहे, तर Rs 500 च्या टॉप-अप रिचार्ज मध्ये Rs 420.73 चा टॉक टाइम मिळत आहे आणि सोनंही प्लान्सची वैधता लाइफटाइम साठी आहे. जर दोन्ही कंपन्यांच्या प्लान्सची तुलना केल्यास वोडाफोन अधिक चांगले बेनेफिट्स ऑफर करत आहे.