VODAFONE चा RS 299 वाला प्रीपेड प्लान लॉन्च एयरटेल देईल का टक्कर?
एकूण वैधता आहे 70 दिवस
एयरटेलच्या प्लान मध्ये मिळतो प्रतिदिन 3GB डेटा
वोडाफोनचा नवीन प्लान वॉयस कॉलिंग साठी आहे चांगला
Vodafone ने आपल्या प्रीपेड यूजर्स साठी नवीन प्लान आणला आहे ज्याची किंमत Rs 299 ठेवण्यात आली आहे आणि हा प्लान खासकरून त्या यूजर्स साठी आहे जे बजेट मध्ये एक दीर्घ वैधतेचा प्लान शोधत आहेत. Rs 299 मध्ये येणाऱ्या या prepaid प्लानची वैधता 70 दिवस आहे, पण यात मिळणारे फायदे बाजारात इतर प्लान्सच्या तुलनेत काही खास देत नाही. भारती एयरटेल पण प्रीपेड सेगमेंट मध्ये Rs 299 चा प्लान ऑफर करत आहे आणि हा प्लान वोडाफोनच्या तुलनेत खूप चांगला आहे.
Vodafone आपल्या या प्लान मध्ये 3GB 2G/3G/4G डेटा, अनलिमिटेड वॉयस कॉल्स आणि 1000 SMS ऑफर करतो. तसेच Bharti Airtel बद्दल बोलायचे तर हा प्लान अनलिमिटेड वॉयस कॉल्स, प्रतिदिन 100 SMS आणि प्रतिदिन 3GB डेटा ऑफर करतो, पण या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे. त्याचप्रमाणे एयरटेलच्या प्लान सोबत एका महिन्यासाठी Rs 129 मध्ये येणारे अमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन मोफत मिळते.
VODAFONE RS 299 PREPAID PLAN
Rs 299 चा हा प्रीपेड प्लान वोडाफोनचा एक बोनस कार्ड आहे जो 70 दिवसांची वैधता देतो आणि सब्सक्राइबर्स या प्लान अंतर्गत अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्सचा लाभ घेऊ शकतात आणि प्लान मध्ये एकूण वैधतेसाठी 3GB डेटा आणि 1000 SMS ऑफर केले जातात. या प्लानची वैधता 70 दिवसांची ठेवण्यात आली आहे.
प्लानच्या बद्दल एक नावडणारी बाब अशी कि यूजर्सना संपूर्ण वैधतेसाठी फक्त 3GB डेटा मिळत आहे आणि त्याचप्रमाणे युजर्स 1000 SMS च वापरू शकतात. हा प्लान त्याच यूजर्स साठी योग्य म्हणता येईल जे डेटा पेक्षा जास्त कॉल्सचा वापर करतात.