रोज 2GB डेटा साठी सादर केला VODAFONE ने नवीन स्वस्त प्लान
प्लानची वैधता 28 दिवस
प्रतिदिन मिळेल 2GB डेटा
Rs 16 चा फिल्मी प्लान पण केला आहे सादर
Vodafone असो दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी जसे कि एयरटेल, रिलायंस जियो सर्व आपले यूजर्स कायम ठेवण्यासाठी साठी नवनवीन प्लान्स सादर करत आहेत. वोडाफोन ने एका नवीन रिचार्ज प्लानची घोषणा केली आहे जो 229 रुपयांमध्ये आला आहे. हा नवीन प्रीपेड रिचार्ज डेटा आणि कॉल्स बेनिफिट ऑफर करतो. TelecomTalk च्या रिपोर्ट नुसार, प्लान मध्ये यूजर्सना प्रतिदिन 2GB डेटा, अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स मिळतात आणि प्लानची वैधता 28 दिवस आहे.
VODAFONE च्या RS 229 प्लानचे फायदे
- प्रतिदिन 2GB डेटा,
- अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स
- प्लानची वैधता 28 दिवस
- रोज 100 SMS
- वोडाफोन प्ले ऍपचे फ्री सब्सक्रिप्शन
डेटा बेनिफिट व्यतिरिक्त यूजर्स रोज 100 SMS चा वापर पण करू शकतात. वोडाफोन सब्सक्राइबर्स या रिचार्ज प्लान अंतर्गत वोडाफोन प्ले ऍप वर फ्री लाइव टीवी, मुव्हीज इत्यादी पण बघू शकता. Rs 229 च्या या प्लान आधी यूजर्सना हेच फायदे Rs 255 च्या प्रीपेड प्लान मध्ये मिळत होते. पण आता Rs 255 मध्ये कोणताही प्लान उपलब्ध नाही आणि या प्लानच्या जागी Rs 229 च्या स्वस्त प्लानने घेतली आहे.
दरम्यान वोडाफोन ने Rs 20 च्या श्रेणी मध्ये पण एक प्लान आणला आहे. Rs 16 च्या फिल्मी प्लान मध्ये 1GB 3G किंवा 4G डेटा मिळतो. या प्लानच्या नावाप्रमाणेच हा प्लान खासकरून त्या यूजर्स साठी आहे जे ऑनलाइन मुव्हीज किंवा शोज बघतात. Rs 16 च्या प्लान मध्ये कोणतेही कॉल किंवा SMS बेनिफिट मिळत नाहीत. वोडाफोनच्या या प्लानची वैधता 24 तास आहे.