Jio ला टक्कर देण्यासाठी Vodafone ने सादर केले नवीन प्रीपेड प्लान्स

Jio ला टक्कर देण्यासाठी Vodafone ने सादर केले नवीन प्रीपेड प्लान्स
HIGHLIGHTS

आता हे प्लान्स काही सर्कल्स मध्ये उपलब्ध आहेत पण लवकरच हे संपूर्ण भारतात सादर केले जाऊ शकतात.

Vodafone ने Jio ला टक्कर देण्यासाठी दोन नवीन स्वस्त प्रीपेड प्लान्स सादर केले आहेत. हे दोन्ही नवीन प्लान्स Rs 569 आणि Rs 511 च्या किंमतीत उपलब्ध आहेत ज्यात क्रमश: प्रतिदिन 3GB आणि 2GB डाटा मिळत आहे आणि या प्लान्स ची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लान्स च्या माध्यमातून कंपनी ने प्रति GB Rs 2.25 रुपयांनी किंमत कमी करून खुप दिवसांनी Reliance Jio ला मागे टाकले आहे. आता हे प्लान्स काही सर्कल्स मध्ये उपलब्ध आहेत पण लवकरच हे संपूर्ण भारतात सादर केले जाऊ शकतात. 
Rs 569 चा नवीन प्लान
Rs 569 च्या नव्या प्रीपेड प्लान मध्ये प्रतिदिन हाई स्पीड 3GB 3G/4G डाटा मिळत आहे आणि या प्लान ची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लान मध्ये अनलिमिटेड वॉइस कॉल आणि SMS सर्विस पण आहेत. यूजर्स प्रतिदिन 250 मिनट्स वॉइस कॉल्स आणि प्रतिसप्ताह 1000 मिनट्स वॉइस कॉल्स करू शकतात, तसेच प्रतिदिन 100 SMS पाठवू शकतात. 
Rs 511 चा नवीन प्लान
Rs 511 च्या प्लान मध्ये प्रतिदिन 2GB 4G/3G डाटा मिळत आहे. त्याचबरोबर हा प्लान अनलिमिटेड वॉइस कॉल्स आणि 100 SMS ऑफर करतो. हा प्लान पण 84 दिवसांसाठी वैध आहे. या प्लान मध्ये यूजर्सना एकूण 168GB डाटा मिळत आहे. 
Rs 500 मध्ये येणारे Vodafone चे प्लान्स
Vodafone चे दोन प्लान्स Rs 549 आणि Rs 509 मध्ये पण जवळपास सारखेच बेनेफिट्स मिळतात. Rs 549 च्या प्रीपेड प्लान बद्दल बोलायचे झाले तर या प्लान मध्ये यूजर्सना प्रतिदिन 3.5GB डाटा मिळतो पण याची वैधता 28 दिवसांची आहे, तर Rs 509 च्या प्लान मध्ये प्रतिदिन 1.4GB डाटा मिळतो ज्याची वैधता 90 दिवसांची आहे. 
Vodafone चे Rs 569 आणि Rs 511 प्रीपेड प्लान्स आता फक्त काही सर्कल्स मध्येच उपलब्ध आहे. सध्यातरी कोणतीही भारतीय टेलिकॉम कंपनी 84 दिवसांसाठी प्रतिदिन 3GB डाटा ऑफर करत नाही. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo