Vodafone ने 69 दिवसांच्या वैधतेसह सादर केला हा स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लान, बघा किंमत किती आहे

Vodafone ने 69 दिवसांच्या वैधतेसह सादर केला हा स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लान, बघा किंमत किती आहे
HIGHLIGHTS

वोडाफोनने भारतीय टेलीकॉम बाजारात त्यांचा नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान म्हणजे Rs 396 मध्ये येणार प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे, हा प्लान कंपनी ने 69 दिवसांची वैधता आणि डेली डेटा सुविधांसह लॉन्च केला गेला आहे.

Vodafone India ने काही दिवसांपूर्वी त्यांच्या Rs 399 मध्ये येणाऱ्या प्लान मध्ये काही बदल करून यात डेटा कमी द्यायला सुरवात केली आहे. याचा अर्थ असा कि तुम्हाला आता वोडाफोनच्या Rs 399 मध्ये येणाऱ्या प्लान मध्ये कमी डेटा मिळत आहे. पण या प्लान मधील वैधता वाढवण्यात आली आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती पण दिली आहे आणि तुम्ही डिजिट मराठीवर जाऊन याबद्दल जास्त माहिती घेऊ शकता. पण वोडाफोन ने आता एक नवीन प्लान पण सादर केला आहे.

हा प्लान कंपनीने Rs 396 मध्ये लॉन्च केला आहे, सोबत यात तुम्हाला जे बेनिफिट मिळत आहेत ते Rs 399 मध्ये मिळणाऱ्या प्लान प्रमाणे आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो कि वोडाफोन ने आपल्या या नवीन प्लान मध्ये तुम्हाला 1.4GB डेटा 69 दिवसांसाठी दिला जात आहे. हे जे काही या प्लान मध्ये तुम्हाला मिळत आहे ते बऱ्याच अंशी Rs 399 मध्ये येणाऱ्या प्लानशी मिळतेजुळते आहे.

तसेच या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉयस कॉलिंग मिळतेच पण यात तुम्हाला 100 SMS प्रतिदिन मिळत आहेत. सोबत तुम्हाला वोडाफोन प्ले चे सब्सक्रिप्शन पण दिले जात आहे. आइडियाच्या एका प्लानची चर्चा करायची झाल्यास कंपनी ने एक Rs 392 मध्ये येणार प्रीपेड प्लान लॉन्च केला होता, जो 60 दिवसांच्या वैधतेसह येतो.

वोडाफोनचा नवीन प्रीपेड प्लान

वोडाफोनच्या Rs 396 मध्ये येणाऱ्या प्लान बद्दल बोलायचे झाले तर सोप्प्या शब्दात हा प्लान कंपनीच्या Rs 399 वाल्या प्लानच्या रिप्लेसमेंट प्रमाणे लॉन्च केला गेला आहे. हा प्लान तुम्हाला आधी 70 दिवसांच्या वैधतेसह मिळत होता, पण आता या प्लान मध्ये डेटा कमी करून वैधता 70 दिवसांवरून 84 दिवस करण्यात आली आहे.

तसेच या प्लान मध्ये तुम्हाला कॉलिंग वर कोणत्याही प्रकारची FUP लिमिट मिळत नाही. वोडाफोनच्या या प्रीपेड प्लान मध्ये तुम्हाला 1.4GB डेटा दिला जात आहे, सोबत यात तुम्हाला 69 दिवसांसाठी 100 SMS पण प्रतिदिन या हिशोबाने मिळत आहेत. इतकेच नव्हे तर तुम्हाला वोडाफोन प्ले ऍप्लीकेशनचे सब्सक्रिप्शन पण मिळत आहे.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo