Vodafone ने सादर केला Rs 255 चा नवीन प्रीपेड प्लान, प्रतिदिन मिळत आहे 2GB डेटा
या नव्या प्लान मध्ये Vodafone प्रतिदिन 2GB 4G/3G डेटा देत आहे ज्याची वैधता 28 दिवसांची आहे.
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरवात टेलिकॉम कंपन्यांनी आपले नवीन टॅरिफ प्लान्स सादर केले आहेत ज्यामुळे आपल्या ग्राहकांना चांगल्या ऑफर्स आणि अनुभव देऊ शकतील. Vodafone इंडिया ने आपला Rs 255 चा नवीन प्रीपेड टॅरिफ प्लान सादर केला आहे ज्यामुळे कंपनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना Bharti Airtel, Idea Cellular आणि Reliance Jio ला टक्कर देऊ शकेल.
या नव्या प्लान मध्ये Vodafone प्रतिदिन 2GB 4G/3G डेटा देत आहे ज्याची वैधता 28 दिवसांची आहे. 28 दिवसांसाठी यूजर्स ऐकून 56GB डेटा मिळत आहे. याव्यतिरिक्त यूजर्सना या प्लान अंतर्गत अनलिमिटेड वॉइस कॉल्स आणि प्रतिदिन 100 SMS मिळत आहेत, यूजर्स रोमिंग नेटवर्क वर पण अनलिमिटेड वॉइस कॉल्स चा फायदा घेऊ शकतील.
हा प्लान सध्या काही सर्कल्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. विशेष म्हणजे या प्लान मध्ये यूजर्सना प्रतिदिन 250 मिनिट्स विडियो कॉल्स आणि प्रतिसप्ताह 1000 मिनिट्स वापरायला मिळतील. तसेच यूजर्स फक्त 300 युनीक नंबर्स वर कॉल्स करतील ही लिमिट पूर्ण झाल्यास पूरी यूजर्स चे कॉल स्टैण्डर्ड रेट्स नुसार चार्ज केले जातील. हा प्लान व्यावसायिक वापरासाठी बनवण्यात आला नाही.
हा प्लान कम्पनी ने Airtel आणि Idea Cellular च्या Rs 249 च्या प्रीपेड प्लान ला टक्कर देण्यासाठी लॉन्च केला आहे. Airtel आणि Idea Cellular च्या या प्लान्स मध्ये यूजर्सना प्रतिदिन 2GB डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉल्स आणि प्रतिदिन 100 SMS मिळत आहे. Vodafone च्या या प्लान ची किंमत काही सर्कल्स मध्ये Rs 249 असू शकते तर काही सर्कल्स मध्ये हा प्लान Rs 255 च्या किंमतीत उपलब्ध आहे.
आम्हाला खात्री आहे की Vodafone आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंड मध्ये आपला हा नवीन प्लान लॉन्च नाही करणार कारण अजून या सर्कल्स मध्ये कंपनी ची 4G सर्विस उपलब्ध नाही आहे.