वोडाफोन ने आणली आहे 100% कॅशबॅकची धमाकेदार ऑफर

Updated on 19-Nov-2018
HIGHLIGHTS

वोडाफोन ने आपल्या काही प्रीपेड टॅरिफ प्लान्स वर 100% कॅशबॅकची ऑफर लॉन्च केली आहे. हा कॅशबॅक सब्सक्राइबर्सना काही वाउचर्सच्या रूपात दिला जाईल. तुम्हाला सांगू इच्छितो कि या वाउचर्सची किंमत रीचार्ज प्लानच्या टॅरिफ एवढीच असेल.

भारतात वोडाफोन इंडिया ने 100 परसेंट कॅशबॅक ऑफर लॉन्च केली आहे. सब्सक्राइबर्सना हा कॅशबॅक वाउचर्सच्या रूपात उपलब्ध केला जाईल. त्याचबरोबर हि ऑफर कंपनी आपल्या तीन प्रीपेड टॅरिफ प्लान्स वरच घेऊन आली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो कि प्रीपेड सिमकार्ड यूजर्ससाठीच हि ऑफर वॅलिड आहे. तसेच या वाउचर्सची किंमत रीचार्ज प्लानच्या टॅरिफ इतकीच असेल. पण, रिलायंस जियो आणि एयरटेल सारख्या इतर टेलीकॉम कंपन्यांच्या ऑफर प्रमाणेच वोडाफोनच्या या कॅशबॅक ऑफर वर पण काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. मिळणारे सर्व वाउचर्सची किंमत 50 रुपये असेल. वोडाफोनचे प्रीपेड उपभोगता हे वाउचर्स पुढील रीचार्ज मध्ये रिडीम करू शकतील.

लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे या ऑफरचा लाभ फक्त कंपनीच्या MyVodafone ऍप मधूनच घेता येईल. वोडाफोन ने हि ऑफर आपल्या जवळपास सर्व सर्कल मध्ये लॉन्च केली आहे. अनेक सर्कल्स मध्ये वोडाफोन आपल्या तीन रीचार्ज प्लान्स वर 100 प्रतिशत कॅशबॅक ऑफर देत आहे. यात 399 रुपये, 458 रुपये आणि 509 रुपयांच्या रीचार्ज पॅकचा समावेश आहे. सब्सक्राइबर्स साठी 399 रुपयांच्या प्रीपेड प्लान मध्ये 50 रुपयांचे 8 वाउचर उपलब्ध आहेत. तर 458 रुपयांच्या पॅक मध्ये 9 वाउचर आणि 509 रुपयांच्या पॅक मध्ये 10 वाउचर दिले जातील. MyVodafone ऍप वरून रीचार्ज केल्यानंतर हे फ्री वाउचर्स दिले जातील जे ऍप मधेच दिसतील.
तसे पाहता वोडाफोनची हि धमाकेदार कॅशबॅक ऑफर जवळपास सर्व सर्कल मधील यूजर्स साठी उपलब्ध आहे पण या ऑफर योग्य प्लान मध्ये सर्कल नुसार फरक आहे. चेन्नई टेलीकॉम सर्कल मध्ये 509 रुपयांच्या प्रीपेड रीचार्ज वर 100 परसेंट कॅशबॅक मिळत नाही. त्याचप्रमाणे, बिहार आणि झारखंड मध्ये 409 रुपयांच्या प्लान वर हि ऑफर वॅलिड नाही. तसेच हिमाचल प्रदेश मध्ये हि ऑफर फक्त 458 रुपयांच्या प्लान वरच उपलब्ध आहे तर 399 रुपये आणि 509 रुपयांच्या प्रीपेड प्लान वर कंपनी ने कोणत्याही प्रकारचा कॅशबॅक ठेवला नाही.

बिहार आणि झारखंड, जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा सह मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ सारख्या ठिकाणी वोडाफोनची 4G सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे या सर्व सर्कल मध्ये प्लानच्या टॅरिफ मध्ये फरक आहे. यामुळेच या सर्व सर्कल्स मध्ये योग्य प्लान वर सब्सक्राइबर्सना 50 रुपयांचे कॅशबॅक वाउचर्स देण्यात येत आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो कि 50 रुपयांचे वाउचर्स आधी रीचार्ज करण्यात आलेल्या प्रीपेड नंबर वरच यूजर्स रिडीम करू शकतात म्हणजे यूजर्स हे कॅशबॅक वाउचर्स वोडाफोनच्या दुसऱ्या कोणत्याही प्रीपेड मोबाईल नंबर वर वापरू शकणार नाहीत.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :