Vodafone Idea आणि Reliance Jio या देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहेत. दोन्ही टेलिकॉम ऑपरेटर्स 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन ऑफर करतात. पण Vi च्या पोस्टपेड प्लॅनमध्ये 50GB अतिरिक्त डेटा देण्यात आला आहे. दुसरीकडे, रिलायन्स JIO चा 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे, जो नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ सारख्या सबस्क्रिप्शनसह येतो. चला तर जाणून घेऊयात Jio आणि Vi च्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सर्व काही…
हे सुद्धा वाचा : Flipkart Big Billion Day : शेवटच्या दिवशी जबरदस्त ऑफर, 5 हजार रुपयांमध्ये खरेदी करा स्मार्टफोन
रिलायन्स Jioचा 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन देखील आहे. या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 75GB डेटा दिला जातो. हा डेटा संपल्यानंतर ग्राहकांना 1 GB डेटासाठी 10 रुपये द्यावे लागतील. प्लॅनमध्ये 200GB डेटा रोलओव्हर सुविधा देखील उपलब्ध आहे. हा प्लॅन अमर्यादित व्हॉईस कॉलसह येतो.
याशिवाय या प्लॅनमध्ये 100 SMS ही मोफत उपलब्ध आहेत. विशेष बाब म्हणजे जिओच्या या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, Amazon प्राइम व्हिडिओ आणि डिजनी + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. या प्लॅनमध्ये Jio ऍप्सचा ऍक्सेसही मोफत उपलब्ध आहे.
Vodafone Idea (Vi) चा 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 40GB हाय-स्पीड 4G डेटा मिळतो. याशिवाय, 50GB अतिरिक्त डेटा देखील देण्यात आला आहे. याचा अर्थ तुम्ही फक्त 399 रुपयांमध्ये 90GB हाय-स्पीड डेटाचा लाभ घेऊ शकाल. मात्र, हे लक्षात घेण्यासारखे घ्या की, अतिरिक्त 50 GB इंटरनेट डेटा फक्त ऑनलाइन रिचार्जवर उपलब्ध असेल.
व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये डेटा रोलओव्हर सुविधाही उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये ग्राहकांना 200GB पर्यंत डेटा रोलओव्हर मिळतो. याशिवाय Vodafone Idea च्या या प्लानमध्ये 100 SMS देखील देण्यात आले आहेत. व्होडाफोन वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलची ऑफर दिली जाते. म्हणजेच, देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित लोकल, STD आणि रोमिंग सुविधा मोफत आहेत.
याव्यतिरिक्त, Vi च्या या प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV ऍपचे VIP सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. यासोबतच Vi Movies & TV ऍपद्वारे ZEE5 वर प्रीमियम चित्रपट आणि शोचा आनंदही घेता येतो.