जर तुम्हालाही Vodafone Idea चा VIP नंबर घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत. तुमच्यासाठी व्हीआयपी क्रमांक खरेदी आता करणे सोपे होईल. तुम्हाला VIP क्रमांकासाठी वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत. म्हणजेच, तुम्हाला हे पूर्णपणे मोफत मिळणार आहे.
Vodafone-Idea ची सर्वात प्रसिद्ध सिरीज '9999…' क्रमांक आहे. यामुळेच बहुतेक वापरकर्ते या कंपनीचा VIP क्रमांक खरेदी करण्यास प्राधान्य देतात. तुम्हाला हा VIP क्रमांक खरेदी करायचा असेल, तर पुढील प्रक्रिया बघा :
– सर्वप्रथम तुम्हाला व्होडाफोन-आयडियाच्या अधिकृत साइटवर जावे लागेल.
– यात तुम्हाला अनेक पर्याय दिसतील.
– येथे तुम्हाला फॅन्सी नंबरवर जावे लागेल.
विशेष म्हणजे VI चा फॅन्सी नंबर थेट तुमच्या घरी पोहोचवला जाईल. खरं तर, कंपनी आपल्या ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी ही ऑफर देत आहे.
VI ची अशी कोणतीही संख्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. मात्र, लक्षात घ्या की, सर्व फॅन्सी नंबर विनामूल्य उपलब्ध नाहीत. काही नंबर खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत.
लक्षात घ्या की, तुम्हाला नंबर मागविण्यासाठी आयडी प्रूफची गरज आहे. यासह, तुम्हाला कधीही सिम कार्ड ऑर्डर करता येईल.