दरवाढीनंतर VI यूजर्सना आणखी एक धक्का! आता ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार नाही Unlimited डेटा 

दरवाढीनंतर VI यूजर्सना आणखी एक धक्का! आता ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार नाही Unlimited डेटा 
HIGHLIGHTS

Vodafone Idea ने या महिन्याच्या सुरुवातीला प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली.

Vodafone Idea च्या लोकप्रिय पोस्टपेड प्लॅनमधून अमर्यादित डेटा बेनिफिट रिमूव्ह

Vodafone Idea च्या लोकप्रिय पोस्टपेड प्लॅनमध्ये OTT सबस्क्रिप्शन्स देखील उपलब्ध

देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea ने या महिन्याच्या सुरुवातीला प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सच्या किमती वाढवल्या. त्यानंतर, आता VI ने पुन्हा एकदा आपल्या वापरकर्त्यांना धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय पोस्टपेड प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा देणे बंद केले आहे. अनलिमिटेड डेटा बेनिफिट या प्लॅनचा सेलिंग पॉईंट होता.

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 751 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या इतर फायद्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता, पोस्टपेड प्लॅन्समध्ये उपलब्ध असलेल्या अपडेटेड बेनिफिट्सबद्दल जाणून घेऊयात-

Vodafone Idea VI
Vodafone Idea

VI चा 751 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन

VI च्या 751 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमधून अमर्यादित डेटा बेनिफिट रिमूव्ह केला आहे. अमर्यादित डेटाऐवजी या प्लॅनमध्ये 200GB डेटा रोलओव्हरसह फक्त 150GB डेटा उपलब्ध असेल. मात्र, वापरकर्ते मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अमर्यादित डेटाचा लाभ घेण्यास सक्षम असतील. हे फिचर अगदी Binge All Night सारखे आहे, जे प्रीपेड प्लॅन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये OTT बेनिफिट्स उपलब्ध आहेत. Vi च्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये Amazon Prime सहा महिन्यांच्या मोफत सबस्क्रिप्शनसह उपलब्ध आहे. तर, Disney + Hotstar, Sony Liv आणि Sun Nxt चे सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मोफत आहे. याशिवाय, यात EaseMyTrip, EazyDiner आणि Swiggy चे सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.

Vodafone Idea 751 POSTPAID PLAN

याव्यतिरिक्त, Vodafone Idea च्या पोस्टपेड प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग दिले जात आहे. याद्वारे वापरकर्ते कोणत्याही नेटवर्कवर तासनतास बोलू शकतात. तसेच, दरमहा 3000SMS उपलब्ध असतील. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये VI गेम्सचे सबस्क्रिप्शनही दिले जात आहे. या अंतर्गत वापरकर्ते VI App वर मल्टीप्लेअर गेम खेळू शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo