Vodafone Idea कंपनी आपल्या अप्रतिम बेनिफिट्ससह येणाऱ्या रिचार्ज प्लॅनसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या वैधतेसह प्लॅन्स या कंपनीकडे उपलब्ध आहेत. दीर्घकालीन वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्सबद्दल बोलायचे झाल्यास, बहुतेक खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या 84 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅन्स ऑफर करतात. मात्र, VI कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये 90 दिवसांच्या वैधतेचा पर्याय युजर्सना देत आहे.
या वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्समध्ये वापरकर्त्यांना मोफत दैनिक डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज मोफत SMS तसेच OTT सबस्क्रिप्शनचे लाभ मिळतात. या प्लॅन्सची किंमत अवघ्या 279 रुपयांपासून सुरु होते. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता बघुयात यादी.
वर सांगितल्याप्रमाणे, 90 दिवसांची वैधता असलेला Vi कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन 279 रुपयांचा आहे. यामध्ये यूजर्सना 279 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. किरकोळ डेटाची गरज भागवण्यासाठी प्लॅनमध्ये 500MB डेटा ऍक्सेस देखील समाविष्ट आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये इतर कोणतेही फायदे उपलब्ध नाहीत. जर तुम्हाला सेकंडरी सिम सक्रिय ठेवण्यासाठी एखादा प्लॅन हवा असेल तर, हा प्लॅन बेस्ट आहे.
Vi चा 902 रुपयांचा प्लॅन देखील 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS ची सुविधा मिळते. एवढेच नाही, तर या प्लॅनमध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठी तीन महिन्यांच्या वैधतेसह SunNXT सबस्क्रिप्शन देखील देण्यात येतात.
Vi च्या पुढील प्लॅनची किंमत 903 रुपये आहे. म्हणजेच या प्लॅनसाठी वरील प्लॅनपेक्षा तुम्हाला केवळ एक रुपया जास्त द्यावा लागणार आहे. लक्षात घ्या की, या प्लॅनचे फायदे 902 रुपयांच्या प्लॅनसारखेच आहेत. फरक फक्त OTT बेनिफिटमध्ये आहे. या प्लॅनमध्ये युजर्सच्या मनोरंजनाची विशेष सोय करण्यात आली आहे. यामध्ये यूजर्सना SonyLiv चे सबस्क्रिप्शन 90 दिवसांपर्यंत मिळेल.