Vodafone Idea VI कडून मोठे गिफ्ट! इंटरनेट संपण्याची चिंता मिटली, आता 24 तास मिळेल Unlimited डेटा
Vodafone Idea VI ने आपल्या यूजर्सना एक खास भेट ऑफर केली आहे.
VI Nonstop Hero Truly Unlimited डेटा प्लॅन्समध्ये 24 तास डेटा उपलब्ध
Vodafone Idea (Vi) नॉनस्टॉप हिरो बेनिफिट तुम्हाला 365 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्लॅनमध्ये मिळेल.
आपणा सर्वांना माहीतीच आहे की, डिजिटल युगात इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे. आता सर्व कामांसाठी इंटरनेटचा वापर होत असल्यामुळे 1GB, 2GB आणि 3GB दैनिक डेटा देखील वापरकर्त्यांसाठी पुरेसा उरला नाही. दरम्यान, ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन Vodafone Idea VI ने आपल्या यूजर्सना एक खास भेट ऑफर केली आहे. काही काळापूर्वी कंपनीने आपले लोकप्रिय हिरो बेनिफिट्स बदलून सुपर हिरो बेनिफिट्स केले होते.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या बदलानंतर मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध अमर्यादित डेटाची मर्यादा वाढवून मध्यरात्री 12 ते दुपारी 12 करण्यात आली. तर, आता कंपनीने या बेनिफिटमध्ये आणखी वाढ केली आहे.
VI Nonstop Hero Truly Unlimited Data Plans
VI ने आता VI नॉनस्टॉप हिरो फायदे त्यांच्या वापरकर्त्यांसाठी जाहीर केले आहेत. या बेनिफिटअंतर्गत , वापरकर्त्यांना दिवसभर अमर्यादित डेटाचा ऍक्सेस मिळणार आहे. जेणेकरून तुम्हाला दिवसभरात दैनिक डेटा संपण्याची अजिबात चिंता राहणार नाही. Vodafone Idea (Vi) नॉनस्टॉप हिरो बेनिफिट सध्या फक्त काही मंडळांमध्ये उपलब्ध आहे. हे प्लॅन आंध्र प्रदेश, कर्नाटक, कोलकाता, महाराष्ट्र आणि गोवा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये उपलब्ध आहे.
पुढील प्लॅन्समध्ये मिळेल 24 तास अमर्यादित डेटा
Vodafone Idea (Vi) नॉनस्टॉप हिरो बेनिफिट तुम्हाला 365 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्लॅनमध्ये मिळेल. याशिवाय, यामध्ये 379, 407, 408, 449, 469, 649, 795, 979, 994, 996, 997, 998 आणि 1198 रुपयांचे अनेक प्लॅन देखील समाविष्ट आहेत. या सर्व योजना वापरकर्त्यांना अमर्यादित डेटाचा ऍक्सेस देतात. रिचार्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
सविस्तरपणे बोलायचे झाल्यास, 365 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि डेटा अमर्यादित आहे. एवढेच नाही तर, दररोज 100 मोफत SMS लाभ देखील उपलब्ध आहेत. तसेच, 379 रुपयांचा प्लॅन 1 महिन्याच्या वैधतेसह समान फायदे देतो. याव्यतिरिक्त, 407 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह 365 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच फायदे देतो. फक्त हा प्लॅन SUNNXT TV मोबाईलच्या 30 दिवसांच्या सबस्क्रिप्शनसह येतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile