Vodafone Idea New Plan: प्रसिद्ध Vodafone Idea VI ने अलिडकेच आपल्या प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली आहे. त्यानंतर, आता टेलिकॉम विश्वात नव्या प्लॅन्सची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. कंपनीने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एक नवीन REDX प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची किंमत ‘1201’ रुपये आहे. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये इतर बेनिफिट्ससह तुमच्या मनोरंजनाचीही काळजी घेतली गेली आहे.
दरम्यान, आम्ही तुम्हाला सांगतो की, Vodafone Idea ही भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन्स आणि आकर्षक ऑफर्स सादर करत असते. या सिरीजमध्ये कंपनीने आता एक नवीन पोस्टपेड प्लॅन लाँच केला आहे. जाणून घेऊयात 1201 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमधील बेनिफिट्स-
कंपनीच्या नवीन VI REDX पोस्टपेड प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन 1201 रुपये प्रति महिना आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, यापूर्वी कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये 1,101 चा REDX पोस्टपेड प्लॅन आणत असे. मात्र, आता हा प्लॅन यादीतून काढून टाकण्यात आला आहे. या प्लॅनऐवजी 1201 रुपयांचा प्लॅन यादीत समाविष्ट केला गेला आहे.
Vodafone Idea च्या नव्या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक आकर्षक बेनिफिट्स मिळतात. यामध्ये अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळते. याव्यतिरिक्त, प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा देखील मिळणार आहे. यासह, या प्लॅनमध्ये तुम्ही दरमहा 3000SMS पाठवू शकता.
वर सांगितल्यराप्रमाणे, या प्लॅनमध्ये युजर्सच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. हा प्लॅन तुम्हाला Netflix Basic, Amazon Prime, Disney + Hotstar, SonyLIV Premium, SunNXT सारख्या प्लॅटफॉर्मवर सहा महिन्यांसाठी फ्री सबस्क्रिप्शन ऑफर करतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, Netflix आणि Amazon चे सदस्यत्व 6 महिन्यांसाठी मिळेल. तर, Disney Plus Hotstar आणि SonyLIV चे सदस्यत्व 1 वर्षासाठी मिळणार आहे.
जर तुम्ही Vodafone Idea चे पोस्टपेड ग्राहक असाल तर तुम्ही हा प्लॅन खरेदी करू शकता. या प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला अनेक आश्चर्यकारक बेनिफिट्स देत आहे. प्लॅनबद्दल सविस्तर माहितीसाठी आणि प्लॅन खरेदी करण्यासाठी Vodafone Idea च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.