VI New Plan: नव्या प्लॅनमध्ये मिळतील अप्रतिम बेनिफिट्स! Unlimited कॉलिंगसह भरपूर डेटा उपलब्ध

VI New Plan: नव्या प्लॅनमध्ये मिळतील अप्रतिम बेनिफिट्स! Unlimited कॉलिंगसह भरपूर डेटा उपलब्ध
HIGHLIGHTS

Vodafone Idea VI ने एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे.

Vodafone Idea VI ने या प्लॅनची किंमत 340 रुपये इतकी निश्चित केली.

VI चा हा नवीन प्लॅन अधिकृत वेबसाइटवर सूचीबद्ध करण्यात आला आहे.

VI New Plan: प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Vodafone Idea VI ने एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना कमी किमतीत अनेक फायदे मिळतात. कंपनीने नव्या प्लॅनची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे. लोकप्रिय टेलिकॉम कंपनीने दैनिक डेटा आणि अमर्यादित कॉलिंग सारख्या अनेक फीचर्ससह त्यांचे प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. कंपनीचा हा नवीन प्लॅन अधिकृत वेबसाइटवर सूचीबद्ध करण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या प्लॅनची किंमत आणि बेनिफिट्स-

Vodafone Idea चा 340 रुपयांचा प्लॅन

होय, Vodafone Idea VI ने या प्लॅनची किंमत 340 रुपये इतकी निश्चित केली आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये भरपूर डेटा तसेच इतर महत्त्वाचे बेनिफिट्स मिळतील. कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन श्रेणीमध्ये हा प्लॅन गुपचूपपणे जोडला आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, या प्लॅनअंतर्गत, वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळेल. याव्यतिरिक्त, या पॅकमध्ये दररोज 1GB डेटा मिळतो. दैनंदिन डेटा संपल्यानंतर, डेटा स्पीड 64kbps पर्यंत कमी होईल.

Vodafone Idea VI NEW PLAN

केवळ डेटाच नाही तर, तुम्हाला इतरही बेनिफिट्स मिळतील. व्होडाफोन आयडियाच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 100SMS ची सुविधा देखील मिळणार आहे. यासह या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील आहे. जेणेकरून तुम्हाला पार्टनर मित्रपरिवार आणि कुटुंबातील लोकांशी फोनवर बोलताना कुठलाही अडथडा येणार नाही. या प्लॅनची वैधता जवळपास एक महिना म्हणजेच 28 दिवसांची आहे.

Vodafone Idea चा 28 दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लॅन

Vodafone Idea कडे आणखी एक प्लॅन आहे, जो वरील समान बेनिफिट्ससह येतो. या प्लॅनची किंमत 299 रुपये इतकी आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंगसह दररोज 1GB मोबाइल डेटा मिळत आहे. तसेच, या प्लॅनची ​​वैधता देखील 28 दिवसांची आहे.

या प्लॅनमध्येही तुम्हाला दररोज 100 मोफत SMS मिळतात. जास्त किमतीत समान फायदे देणारा नवीन प्लॅन लाँच करण्यामागील कंपनीचा हेतू अद्याप कुणालाही स्पष्ट झाला नाही. जर वापरकर्त्यांना कमी किमतीत सर्व फायदे मिळत असतील तर त्यांना नवीन प्लॅनची आवश्यकता भासणार नाही. याशिवाय, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये दररोज डेटा आणि अमर्यादित कॉलिंग आणि इतर बेनिफिट्ससह अनेक प्लॅन आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo