भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. कंपनीकडे भारी बेनिफिट्ससह अनेक प्लॅन्स समाविष्ट आहेत. VI च्या या प्लॅनची किंमत 175 रुपये आहे. हा प्लॅन खास युजर्सच्या मनोरंजनासाठी सादर केला गेला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्लॅन वापरकर्त्यांना एकाच वेळी एकाधिक OTT प्लॅटफॉर्मवर मोफत ऍक्सेस प्रदान करेल. हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी योग्य असेल, ज्यांना डेटासह चित्रपट आणि वेब सीरीज पाहणे आवडते.
तुम्हाला माहितीच असेल की, OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन खरेदी करणे, सामान्य युजर्सच्या खिशाला परवडणारे नाही. ही समस्या लक्षात घेऊन VI ने आपल्या ग्राहकांसाठी खास OTT प्लॅन सादर केला आहे. Vodafone Idea च्या नव्या 175 रुपयांच्या OTT प्लॅनचे बेनिफिट्स-
Vodafone Idea चा नवीन OTT प्लॅन 200 रुपयांअंतर्गत येतो. वर सांगितल्याप्रमाणे, हा कंपनीचा OTT प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकाच वेळी अनेक OTT ॲप्सचे ऍक्सेस मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. त्याबरोबरच, बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला 10GB डेटा देखील मिळणार आहे. लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग आणि SMS फायदे मिळणार नाहीत.
Vodafone Idea चा हा प्लॅन VI Movies आणि TV Super चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करतो. या सिंगल लॉग-इनसह, तुम्हाला 15 OTT ॲप्स आणि 400 TV चे सब्सक्रिप्शन मिळेल. या अंतर्गत ZEE5, SonyLIV, FanCode, Atrangi, Klikk, Chaupal, NammaFlix, Manorama MAX, PlayFlix, Distro TV, Shemaroo Me, Hungama, YuppTV, NexGTv आणि Pocket Films यांचा समावेश उपलब्ध आहे.
नव्या प्लॅनबद्दल अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी VI ॲप आणि अधिकृत वेबसाइटवर व्हिजिट करा. जर तुम्ही बिनधास्त प्रेक्षक असाल आणि तुम्हाला नवीन चित्रपट आणि शो पाहणे आवडते. जर तुमच्या घरी Wi-Fi कनेक्शन असेल तर, तुमच्यासाठी हा प्लॅन अप्रतिम ठरेल.
Vodafone Idea चा 26 रुपयांचा प्लॅन डेटा व्हाउचर आहे. कंपनीच्या नव्या डेटा प्लॅनची किमत 26 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन तुम्हाला एका दिवसाच्या वैधतेसह 1.5GB डेटा देण्यात आला आहे. सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.