Vodafone Idea VI ने आपल्या जुन्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनपैकी एक प्लॅन परत सादर केला आहे. तुमच्या लक्षात असेलच की, काही काळापूर्वी Airtel आणि Jio सोबत VI ने देखील आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत वाढ केली होती. दरवाढीपूर्वी कंपनी 719 रुपयांचा प्लॅन ऑफर करत होती. तर, दरवाढीनंतर या प्रीपेड प्लॅनची किंमत 859 रुपये झाली आहे. तर, युजर्ससाठी हातात आनंदाची बातमी आहे, Vodafone Idea ने पुन्हा 719 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. जाणून घेऊयात नव्या 719 रुपयांच्या प्लॅनचे तपशील-
Also Read: Xiaomi 14 Civi वर मिळतोय हजारो रुपयांचा Discount, बँक ऑफर्ससह स्वस्तात खरेदीची संधी
प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी VI ने अनेक फायद्यांसह हा नवीन 719 रुपयांचा प्लॅन रीलाँच केला आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा मिळणार आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. याव्यतिरिक्त, VI च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 100 फ्री SMS देखील मिळतात.
कंपनीने हा प्लॅन दीर्घकाळ वैधतेसह लाँच केला आहे. हा प्लॅन इतर साधारण प्लॅनसारखा तीन महिन्यांच्या वैधतेसह नाही तर, हा पॅक तब्बल 72 दिवसांच्या वैधतेसह येतो. लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये OTT चे मोफत सबस्क्रिप्शन सारखे इतर कोणतेही फायदे दिलेले नाहीत. प्लॅनबद्दल अधिक माहितीसाठी Vodafone Idea च्या अधिकृत साईटला भेट द्या. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा!
Vodafone Idea कंपनीच्या 859 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅनची किंमत वाढण्यापूर्वी 719 रुपये होती. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच, यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS दररोज मिळतात. एवढेच नाही तर, हा पॅक तीन दिवसांसाठी अतिरिक्त 5GB डेटा प्रदान करतो. या प्लॅनची वैधता 84 दिवसांपर्यंत आहे.