भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea च्या युजर्ससाठी चिंताजनक बातमी आणली आहे. Vodafone Idea VI ने त्यांच्या एका प्रीपेड प्लॅनच्या किमतीत वाढ केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, लोकप्रिय टेलिकॉम कंपनी VI जास्त मोबाइल डेटा वापरणाऱ्यांसाठी अनेक डेटा व्हाउचर ऑफर करते. या प्लॅन्समध्ये यूजर्सना वेगवेगळ्या वैधतेनुसार डेटा लाभ मिळतो. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या युजर्ससाठी हे व्हाउचर्स अप्रतिम ठरतात.
मात्र, कंपनीने आता आपल्या सर्वात स्वस्त डेट व्हाउचरची किंमत वाढवली आहे. कंपनीने यापूर्वीही आपल्या प्लॅन्ससह असे केले आहे. मागील वर्षी झालेल्या टॅरिफ हाईकमुळे आधीच कंपनीचे युजर्स नाराज आहेत. त्यात कंपनीने डेटा व्हाउचर्सची किंमत देखील वाढवली.
वर सांगितल्याप्रमाणे, Vodafone Idea VI कंपनीने पुन्हा एकदा आपल्या सर्वात स्वस्त व्हाउचरच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने किमतीत 1 रुपयांनी वाढ केली आहे. कथित डेटा प्लॅनची किंमत वाढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही कंपनीने या प्लॅनची किंमत एकदा वाढवली आहे. कंपनीने सर्वात स्वस्त डेटा व्हाउचरची किंमत 19 रुपयांवरून 22 रुपयांपर्यंत वाढवली होती. आता त्यात पुन्हा एकदा वाढ केल्यानंतर या डेटा व्हाउचरची किंमत एकूण 23 रुपये केली आहे.
VI च्या 23 रुपयांचा डेटा व्हाउचरबद्दल बोलायचे झाल्यास, VI च्या या डेटा व्हाउचरमध्ये यूजर्सना 1GB डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता संपूर्ण एका दिवसाची आहे. नवीन किंमतीसह हे व्हाउचर Vi च्या अधिकृत वेबसाइटवर सूचीबद्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी 26 रुपयांचे आणखी एक डेटा व्हाउचर ऑफर करते, ज्यामध्ये एका दिवसासाठी 1.5GB डेटा ऑफर केला जातो.
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, VI च्या काही डेटा व्हाउचरमध्ये डेटासह लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता समाविष्ट आहे. कंपनीच्या सर्वात महागड्या डेटा प्लॅनची किंमत 1,189 रुपये इतकी आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये यूजर्सना 50GB डेटा मिळतो. कंपनीच्या या प्रीपेड प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे.