नुकतेच भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या Airtel आणि Jio ने आपल्या प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली आहे. त्यानंतर आता Vodafone Idea च्या ग्राहकांना देखील महागाईचा फटका बसणार आहे. VI ने देखील आपल्या सर्व प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने सर्व पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली. नवीन दर लवकरच लागू केले जाणार आहेत. किंमत वाढल्यानंतर VI च्या बेस प्लॅनची किंमत 179 रुपयांवरून 199 रुपये होईल.
Vi ने त्याच्या सर्व पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅन्सच्या किमती 20 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. या नवीन किमती 4 जुलै 2024 पासून लागू होतील.
199 रुपयांचा प्लॅन: 179 रुपयांच्या बेस प्लॅनची किंमत 199 रुपये इतकी झाली आहे. बेनिफिट्समध्ये 28 दिवसांसाठी 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 300 SMS उपलब्ध आहेत.
509 रुपयांचा प्लॅन: 459 रुपयांच्या प्लॅनची किंमत 509 रुपये इतकी झाली आहे. बेनिफिट्समध्ये 54 दिवसांसाठी 6GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, 300 SMS उपलब्ध आहेत.
1999 रुपयांचा प्लॅन: 1799 रुपयांच्या प्लॅनची किंमत 1999 रुपये इतकी झाली आहे. बेनिफिट्समध्ये 365 दिवसांसाठी 24 GB डाट, अनलिमिटेड कॉलिंग, 300 SMS उपलब्ध आहेत.
299 रुपयांचा प्लॅन: 269 रुपयांच्या प्लॅनची किंमत 299 रुपये इतकी झाली आहे. बेनिफिट्समध्ये 28 दिवसांसाठी 1GB/दिवस डेटा, अमर्यादित कॉलिंग, 100 SMS उपलब्ध आहेत.
349 रुपयांचा प्लॅन: 349 रुपयांच्या प्लॅनची किंमत 299 रुपये इतकी झाली आहे. बेनिफिट्समध्ये 28 दिवसांसाठी 1.5GB/दिवस डेटा, अमर्यादित डेटा (सकाळी 12 ते सकाळी 6) वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डेलाइट, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100SMS उपलब्ध आहेत.
379 रुपयांचा प्लॅन: 349 रुपयांच्या प्लॅनची किंमत 299 रुपये इतकी झाली आहे. बेनिफिट्समध्ये 28 दिवसांसाठी 1.5GB/दिवस डेटा, अमर्यादित डेटा (सकाळी 12 ते सकाळी 6) वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डेलाइट, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100SMS उपलब्ध आहेत.
579 रुपयांचा प्लॅन: 479 रुपयांच्या प्लॅनची किंमत 579 रुपये इतकी झाली आहे. बेनिफिट्समध्ये 56 दिवसांसाठी 1.5GB/दिवस डेटा, अमर्यादित डेटा (सकाळी 12 ते सकाळी 6) वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डेलाइट, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100SMS उपलब्ध आहेत.
649 रुपयांचा प्लॅन: 539 रुपयांच्या प्लॅनची किंमत 649 रुपये इतकी झाली आहे. बेनिफिट्समध्ये 56 दिवसांसाठी 2GB/दिवस डेटा, अमर्यादित डेटा (सकाळी 12 ते सकाळी 6) वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डेलाइट, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100SMS उपलब्ध आहेत.
859 रुपयांचा प्लॅन: 719 रुपयांच्या प्लॅनची किंमत 859 रुपये इतकी झाली आहे. बेनिफिट्समध्ये 84 दिवसांसाठी 1.5GB/दिवस डेटा, अमर्यादित डेटा (सकाळी 12 ते सकाळी 6) वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डेलाइट, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100SMS उपलब्ध आहेत.
979 रुपयांचा प्लॅन: 839 रुपयांच्या प्लॅनची किंमत 979 रुपये इतकी झाली आहे. बेनिफिट्समध्ये 84 दिवसांसाठी 2GB/दिवस डेटा, अमर्यादित डेटा (सकाळी 12 ते सकाळी 6) वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डेलाइट, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100SMS उपलब्ध आहेत.
3499 रुपयांचा प्लॅन: 2899 रुपयांच्या प्लॅनची किंमत 3499 रुपये इतकी झाली आहे. बेनिफिट्समध्ये 365 दिवसांसाठी 1.5GB/दिवस डेटा, अमर्यादित डेटा (सकाळी 12 ते सकाळी 6) वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डेलाइट, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100SMS उपलब्ध आहेत.
451 रुपयांचा प्लॅन: 401 रुपयांचा प्लॅनची किंमत आता 451 रुपये झाली आहे. बेनिफिट्समध्ये यात 1 कनेक्शन मिळतोय, जो 200GB डेटा रोलओव्हरसह 50GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, अमर्यादित रात्री डेटा, 3000 SMS, एक विनामूल्य OTT ॲप सदस्यता सुविधेसह येतो.
551 रुपयांचा प्लॅन: 501 रुपयांचा प्लॅनची किंमत आता 551 रुपये झाली आहे. बेनिफिट्समध्ये यात 1 कनेक्शन मिळतोय, 200GB रोलओव्हरसह 90GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, अमर्यादित रात्री डेटा, 3000 SMS, 2 विनामूल्य OTT ॲप सदस्यता सुविधेसह येतो.
701 रुपयांचा फॅमिली प्लॅन: 601 रुपयांचा फॅमिली प्लॅनची किंमत आता 701 रुपये झाली आहे. बेनिफिट्समध्ये यात दोन कनेक्शन मिळतात, हा प्लॅन रोल-ओव्हरसह 70GB प्राथमिक + 40GB डेटा दुय्यम, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, अमर्यादित नाईट डेटा, 3000SMS, 2 विनामूल्य ॲप सदस्यता सुविधेसह येतो.
1201 रुपयांचा फॅमिली प्लॅन: 1001 रुपयांचा फॅमिली प्लॅनची किंमत आता 1201 रुपये झाली आहे. बेनिफिट्समध्ये यात 4 कनेक्शन मिळतात, हा प्लॅन रोल-ओव्हरसह 140GB प्राथमिक + 40GB डेटा दुय्यम, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, अमर्यादित नाईट डेटा, 3000 SMS, 2 विनामूल्य ॲप सदस्यता सुविधेसह येतो.