IMC 2024 म्हणजेच इंडियन मोबाईल काँग्रेस इव्हेंटमध्ये भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी Vodafone Idea ने 5G आणि IoT म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाने सुसज्ज सर्व्हिस प्रदर्शित केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, यामध्ये रेडी फॉर नेक्स्ट प्रोग्राम टू AI पॉवर्ड हायब्रिड SD-WAN चा समावेश आहे. त्याला कंपनीने ‘The Future is Now’ ही थीम दिली आहे. त्यांच्या फ्युचरिस्टिक सोल्युशनचा लोकांना भविष्यात खूप फायदा होईल, असा विश्वास कंपनीने दर्शवला आहे. जाणून घेऊयात सविस्तर तपशील-
IMC 2024 इव्हेंटमध्ये Vodafone Idea ने आपला ‘Ready for Next Program’ प्रदर्शित केला आहे. या प्रोग्रामचे वैशिष्ट्य म्हणजे ते लहान आणि मध्यम व्यवसायांना विनामूल्य डिजिटल सल्लागार सेवा प्रदान करण्यास सक्षम आहे. यासाठी कंपनीने 16 क्षेत्रातील 1.6 लाख MSMEs सह हात मिळवले आहे, असे सांगण्यात आले आहे.
Vi ने मेगा इव्हेंटमध्ये ‘क्लिनिक इन अ बॅग’ सेवा देखील सादर केली आहे. याद्वारे डॉक्टरांना कोणत्याही ठिकाणी रुग्णांचे रिअल टाईम अहवाल मिळू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, ज्या दुर्गम भागात तज्ज्ञ आणि उपकरणांची कमतरता आहे, अशा ठिकाणी ही सेवा सर्वाधिक उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे. कंपनीने पुढे सांगितले की, या सेवेअंतर्गत 30 वैद्यकीय चाचण्या देखील केल्या जाऊ शकतात. ज्यामध्ये अत्यावश्यक, हृदय आणि फुफ्फुसाचे कार्य, रक्त तपासणी आणि स्क्रीनिंग समाविष्ट आहेत.
Vodafone Idea ने सांगितले की, येत्या काही दिवसांत थेट eSports स्पर्धा आयोजित केली जाईल. या स्पर्धेमध्ये खेळाडू भारतातील आघाडीच्या गेमिंग प्रभावशालींविरुद्ध खेळू शकतील.
इंडस्ट्री 4.0 च्या क्षेत्रात, Vi 5G, IoT, AI, आणि मशीन लर्निंग समाकलीत म्हणजेच ईंटेग्रेट करणारे उपाय सादर करत आहे. जे रिअल-टाइम मॉनिटरिंग क्षमतांसह सिम्युलेटेड स्मार्ट माईनद्वारे प्रदर्शित केले गेले आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI तंत्रज्ञानाने सुसज्ज हायब्रिड SD-WAN देखील या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आले आहे. ही सिस्टम सिक्योरिटी फीचर्ससह सुसज्ज आहे. या सिस्टमचा उपयोग भारतीय उद्योग भविष्यात सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी करता येईल, अशी सांगण्यात आले आहे. Vodafone Idea च्या AI सर्व्हिसबद्दल अधिक माहितीसाठी Vodafone Idea च्या अधिकृत साईटला भेट द्या किंवा येथे क्लिक करा.