Vodafone Idea युजर्सना झटका! आपल्या बेस्ट सेलिंग प्लॅन्सची वैधता केली कमी, जाणून घ्या किंमत

Updated on 06-Dec-2024
HIGHLIGHTS

Vodafone Idea च्या 289 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता झाली कमी

Vodafone Idea च्या या प्लॅनची वैधता 48 दिवसांची होती.

Vodafone Idea ने च्या 479 रुपयांच्या प्लॅनच्या वैधतेत देखील कपात

भारतातील तिसरी सर्वात मोठी कंपनी Vodafone Idea ने त्यांच्या एका प्रीपेड प्लॅनची ​​वैधता कमी केली आहे. अलीकडेच कंपनीने आपल्या प्लॅन्सच्या किमतीत दरवाढ केल्यामुळे ग्राहकांची नाराजी ओढवली आहे. दरम्यान, ग्राहकांना आणखी एक झटका देत कंपनीने आपल्या बेस्ट सेलिंग प्लॅनची वैधता कमी केली आहे. होय, यंदा VI कंपनीने प्लॅनची किंमत वाढवण्याऐवजी त्याची वैधता कमी केली आहे. म्हणजेच आता कंपनीने या प्लानची वैधता कमी करून युजर्ससाठी प्लान महाग केला आहे. जाणून घेऊयात या प्लॅन्सची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-

Vodafone Idea ने ‘या’ प्लॅनची वैधता केली कमी

आम्ही तुम्हाला सांगतो की, Vodafone Idea च्या 289 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता कमी करण्यात आली आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच, तुम्हाला या प्लॅन्ससह दररोज 100 मोफत SMS मिळतात. एवढेच नाही तर, डेटा वापरासाठी देखील तुम्हाला यात 4GB मोबाइल डेटा मिळणार आहे.

Vodafone Idea

वैधतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनची वैधता 48 दिवसांची होती. मात्र, आता कंपनीने हा प्लॅन बदलला आहे. या प्लॅनची ​​वैधता केवळ 40 दिवसांपर्यंत करण्यात आली आहे. म्हणजेच, कंपनीने या प्लॅनची ​​वैधता केवळ 8 दिवसांनी कमी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, वैधता कमी केल्यामुळे या प्लॅनची ​​किंमत सुमारे 40 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आधीपेक्षा हा प्लॅन युजर्ससाठी चांगलाच महागला आहे. रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!

या प्लॅनच्या वैधतेत देखील कपात

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Vodafone Idea ने अलीकडेच आणखी एका प्लॅनची ​​वैधता कमी केली आहे. कथित VI प्लॅनची किंमत 479 रुपये इतकी आहे. पूर्वी हा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो, आता कंपनीने त्याची वैधता केवळ 48 दिवस इतकी केली आहे. एवढेच नाही तर, कंपनीने या प्लॅनमधील डेटा लाभ सुद्धा कमी केला आहे. पूर्वी या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळत होता. आता या प्लॅनमध्ये दररोज केवळ 1GB डेटा मिळेल. तसेच, यात अमर्यादित किलिंग आणि SMS बेनिफिट्स देखील आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :