Vodafone Idea च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर, आपल्या प्रीपेड यूजर्सचा फायदा करण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने एक खास ऑफर आणली आहे. नव्या ऑफरचे नाव ‘Recharge & Fly’ असे आहे. या ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना फ्लाइट तिकीट जिंकण्याची संधी मिळेल.
एवढेच नाही तर, महागड्या फ्लाइट तिकिटांच्या बुकिंगवर तब्बल 5,000 रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. या खास ऑफरसाठी कंपनीने EaseMyTrip शी हातमिळवणी केली आहे. एवढेच नाही तर, व्होडाफोन आयडियाच्या नवीन ऑफर अंतर्गत निवडक प्लॅन्स रिचार्ज करण्यावर वापरकर्त्यांना 50GB डेटा विनामूल्य मिळेल. याशिवाय, वापरकर्त्यांना EaseMyTrip द्वारे तिकीट बुकिंगवर 400 रुपयांचे विशेष डिस्काउंट कूपन देखील दिले जाईल.
Vodafone Idea नुसार रिचार्ज आणि फ्लाय ऑफर आजपासून म्हणजेच 26 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. लक्षात ठेवा की, ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत वैध असेल. या कालावधीदरम्यान वापरकर्त्यांना दर तासाला 5,000 रुपयांपर्यंतचे मोफत फ्लाइट तिकीट जिंकण्याची संधी मिळेल.
वर सांगितल्याप्रमाणे, महागड्या फ्लाइट तिकिटांच्या बुकिंगवर वापरकर्त्यांना 5,000 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. ही ऑफर Vi च्या App वरून घेता येईल, असे कंपनीने सांगितले आहे. युजर्स App द्वारे जितके जास्त रिचार्ज करतील, तितकी फ्लाइट तिकिटे जिंकण्याची शक्यता जास्त आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही VI च्या अधिकृत साईटला भेट देऊ शकता.
Vi ने या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी Vi प्रायोरिटी सर्व्हिस लाँच केली. ही सेवा 699 रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या पोस्टपेड प्लॅनसाठी उपलब्ध आहे. ही सर्व्हिस उत्तम कार्यप्रदर्शन आणि कस्टमर केअर एक्सपेरियन्ससाठी तयार करण्यात आली आहे. या सर्व्हिससह जुळणाऱ्या ग्राहकांना प्राथमिकता दिली जाईल. ही सेवा सध्या देशात दिल्ली, मुंबई, कोलकाता, गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या सर्कल्समध्ये उपलब्ध आहे.