Vodafone Idea च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनसह Disney + Hotstar सबस्क्रिप्शन वर्षभरासाठी Free! किंमतही कमी। Tech News

Vodafone Idea च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनसह Disney + Hotstar सबस्क्रिप्शन वर्षभरासाठी Free! किंमतही कमी। Tech News
HIGHLIGHTS

Vodafone Idea आपल्या ग्राहकांना Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह येणारे अनेक प्रीपेड प्लॅन ऑफर करते.

पुढील सर्व प्लॅन्स Vi Hero Unlimited बेनिफिट्स आणि बोनस डेटासह येतात.

Vodafone Idea चा 601 रुपयांच्या प्लॅनमध्ये वर्षभरासाठी Disney + Hotstarचे सदस्यत्व

आजकल OTT प्लॅटफॉर्म्सवर मुव्हीज, वेब सिरीज आणि ओरिजनल्सची क्रेझ प्रेक्षकांमध्ये वाढतच चालली आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म  Disney + Hotstarचे सब्स्क्रिप्शन मोफत कसे मिळेल? ते सांगणार आहोत. खरं तर, भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर Vodafone Idea आपल्या ग्राहकांना Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह येणारे अनेक प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. जे वापरकर्ते Disney + Hotstar चे सदस्य होण्याचा विचार करत आहेत, तर पुढील प्लॅन्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. 

Vodafone Idea चा 399 रुपयांचा प्लॅन 

disney plus hotstar

Vodafone Idea च्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 2.5GB डेली डेटा मिळतो. याशिवाय प्लॅनमध्ये 5GB बोनस डेटा देखील उपलब्ध आहे. हा प्लॅन Vi Hero Unlimited बेनिफिट्ससह येतो, ज्यात Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delight यांचा समावेश होतो. प्लॅनमधील OTT फायद्यांमध्ये Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन, Vi Movies आणि TV VIP यांचा 3 महिन्यांसाठी समावेश आहे. 

Vodafone Idea चा 499 रुपयांचा प्लॅन 

प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100SMS दररोज मिळतात. या प्लॅनमध्ये, Vi Hero अमर्यादित फायद्यांसह, मोफत Disney + Hotstar मोबाइल सदस्यता, चित्रपट आणि टीव्ही VIP 3 महिन्यांसाठी ऑफर केली जात आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 5GB बोनस डेटा देखील दिला जात आहे.

Vodafone Idea चा 601 रुपयांचा प्लॅन

 तुम्हाला Disney + Hotstarचे सदस्यत्व संपूर्ण वर्षासाठी हवे असेल तर, तुम्ही Vodafone Idea चा 601 रुपयांचा प्लॅन घेता येईल. या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100SMS आणि 3GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनसह वापरकर्त्यांना Vi Hero अमर्यादित फायदे देखील मिळतात. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये संपूर्ण 16GB बोनस डेटा दिला जात आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo