Vodafone-Idea ने आणले भारी प्लॅन्स! तुमचा मनोरंजनसाठी OTT सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध

Vodafone-Idea ने आणले भारी प्लॅन्स! तुमचा मनोरंजनसाठी OTT सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध
HIGHLIGHTS

Vodafone-Idea चे जबरदस्त पोस्टपेड प्लॅन्स

OTT सबस्क्रिप्शनसह इतर बरेच बेनिफिट मिळतील.

चला तर मग बघुयात नवीन प्लॅन्सची यादी

Vodafone-Idea कडे अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स आहेत. यामध्ये प्रत्येक प्राइस रेंजमध्ये तुम्हाला रिचार्ज प्लॅन्स मिळणार आहेत. त्यात अजून काही प्लॅन नव्याने सामील झाले आहेत. 

कंपनीने लाँच केलेले नवे प्लॅन तुम्हाला कमी किमतीत जास्तीत जास्त लाभ देतात. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहकांच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. तुम्हाला OTT सबस्क्रिप्शनसह इतर बरेच बेनिफिट मिळणार आहेत. 

Vodafone-Idea 699 रुपयांचा पोस्पटेड प्लॅन

या प्लॅन मध्ये ग्राहकांना दोन कनेक्शन मिळतात. मात्र, या मध्ये तुम्हाला केवळ एकासाठी खर्च करावा लागणार आहे. कंपनीचा हा प्लॅन एक फॅमिली प्लॅन आहे. ग्राहकांना यात 40GB डेटा मिळतो. 

तसेच, यामध्ये तब्बल 3000 SMS चा लाभ ग्राहकांना मिळतो. हेच सर्व बेनिफिट तुम्हाला दुसऱ्या नंबरवर देखील मिळतील. 

Vodafone-Idea 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन 

या प्लॅन मध्ये ग्राहकांना एकूण चार कनेक्शन मिळतात. असे असूनही यामध्ये देखील फक्त एकच प्लॅनचा खर्च करावा लागणार आहे. या मध्ये अनलिमिटेड कॉलिंग सह 140GB डेटा मिळतो. मात्र, इतर तिन्ही युजर्सना 40GB डेटा मिळतो. 

विशेष म्हणजे या प्लॅन मध्ये ग्राहकांसाठी Prime video चे सबस्क्रिप्शन सहा महिन्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. 

Vodafone-Idea चा 1149 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन 

या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण पाच कनेक्शन मिळतात. असे असूनही यामध्ये देखील फक्त एकच प्लॅनचा खर्च करावा लागणार आहे. यामध्ये सुध्दा अनलिमिटेड कॉलिंगसह 140GB डेटा मिळतो. मात्र, इतर तिन्ही युजर्सना 40GB डेटा मिळतो. 

विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये ग्राहकांसाठी केवळ Prime video चे चं नाही तर Disney+ Hotstar चे एका वर्षाचे सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo