Disney+ Hotstar च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतात अप्रतिम Vodafone Idea प्लॅन्स, किंमत 500 रुपयांपेक्षा कमी

Disney+ Hotstar च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतात अप्रतिम Vodafone Idea प्लॅन्स, किंमत 500 रुपयांपेक्षा कमी
HIGHLIGHTS

Disney + Hotstar च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येणारे VI प्लॅन्स

Vodafone Idea चा या यादीतील सर्वात स्वस्त प्लॅन 151 रुपयांचा आहे.

या VI प्लॅन्समध्ये Bing ऑल नाइट आणि Vi Hero Unlimited चे बेनिफिट्स देखील मिळतील.

Vodafone Idea देशातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम दिग्गज कंपनी आहे. कंपनीकडे विशेष बेनिफिट्ससह अनेक प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. Vodafone Idea च्या प्लॅन्समध्ये तुम्हाला इतर कंपन्यांपेक्षा अधिक बेनिफिट्स मिळतात. जसे की, प्रीपेड प्लॅन्समध्ये कंपनी बिंज ऑल नाईट आणि डेटा रोलओव्हर सारखे भारी बेनिफिट्स ऑफर करते. एवढेच नाही तर, कंपनी आपल्या यूजर्सना अनेक OTT चे फ्री सब्सक्रिप्शन देखील देते.

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Disney + Hotstar च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येणाऱ्या प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत. पाहुयात यादी-

vi plans with disney+hotstar

Vodafone Idea चा 151 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea चा या यादीतील सर्वात स्वस्त प्लॅन 151 रुपयांचा आहे. VI च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना 4GB मोबाईल डेटा मिळणार आहे. या प्लॅनची ​​वैधता एकूण एक महिना म्हणजेच 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney+ Hotstar चे बेनिफिट देखील आहे.

Vodafone Idea चा 169 रुपयांचा प्लॅन

यादीतील दुसऱ्या प्लॅनची ​​किंमत 169 रुपये इतकी आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झल्यास, या प्लॅनमध्ये 8GB डेटा मिळणार आहे. याव्यतिरिक्त, OTT बेनिफिट्समध्ये Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. हा प्लॅन देखील वरील प्लॅनप्रमाणे 30 दिवसांच्या वैधतेसह येतो.

Vodafone Idea Prepaid Recharge

Vodafone Idea चा 469 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea चा 469 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Vi च्या या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह 2.5GB दैनिक डेटा मिळतो. तर, वापरकर्त्यांना दररोज 100SMS मिळतात. याव्यतिरिक्त, हा प्लॅन Disney+ Hotstar च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येते. तसेच, यात Bing ऑल नाइट आणि Vi Hero Unlimited चे बेनिफिट्स देखील मिळतील. Bing ऑल नाइट बेनिफिटमध्ये तुम्हाला रात्री 12 ते सकाळी 6 वाजतापर्यंत मोफत डेटा मिळतो. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo