Vodafone Idea चे अप्रतिम रिचार्ज प्लॅन्स! 20 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय Unlimited डेटा, बघा वैधता

Vodafone Idea चे अप्रतिम रिचार्ज प्लॅन्स! 20 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय Unlimited डेटा, बघा वैधता
HIGHLIGHTS

स्वस्त किमतीत आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये उत्तम फायदे देण्यासाठी VI प्रसिद्ध आहे.

50 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या काही अप्रतिम प्लॅन्स

प्लॅन्समध्ये मिळेल Unlimited नाईट डेटा सारखे बेनिफिट्स उपलब्ध

Vodafone Idea कडे प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​विस्तृत श्रेणी आहे. तसेच, स्वस्त किमतीत आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये उत्तम फायदे देण्यासाठी VI प्रसिद्ध आहे. या रिपोर्टमध्ये आम्‍ही तुम्‍हाला 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या काही अप्रतिम प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. या किमतीत तुम्हाला खरंच अप्रतिम बेनिफिट्स मिळतात. या प्लॅनसह तुम्हाला 4G ची सुविधा मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा: Airtel चे आकर्षक प्रीपेड प्लॅन्स! मिळेल तब्बल 60GB डेटा आणि Unlimited कॉलिंग उपलब्ध। Tech News

VI चे सर्वात स्वस्त प्लॅन्स

17 रुपयांचा प्लॅन

आम्ही तुम्हाला सांगतो की, VI कडे फक्त 17 रुपयांच्या किमतीमध्ये आणखी एक प्लॅन आहे. जो त्याच्या ग्राहकांना एका दिवसासाठी Unlimited नाईट डेटा ऑफर करतो. यासह, तुम्ही सुट्टीच्या आदल्या रात्री मनोरंजासाठी अखंडितपणे चित्रपट किंवा वेब शोज बघू शकता.

Vodafone Idea new plan
Vodafone Idea

19 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea कडे 19 रुपयांचा प्लॅन देखील आहे, जो संपूर्ण 1 दिवसाच्या वैधतेसह येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनमध्ये फक्त 1GB डेटा उपलब्ध आहे. तुमचा दैनंदिन डेटा संपला तरीही तुम्हाला आधी कडाटाची आवश्यकता असेल तर या प्लॅनसह रिचार्ज करणे तुम्हाला परवडणार आहे.

29 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea चा 29 रुपयांचा प्लॅन अधिक डेटासह येतो. जर तुम्हाला 2GB डेटासह येणारा प्लॅन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही 2 दिवसांच्या वैधतेसह हा 29 रुपयांचा प्लॅन देखील खरेदी करू शकता. वेळेवर तुम्हाला अतिरिक्त दातांची गरज असल्यास हा प्लॅन उत्तम ठरेल.

39 रुपयांचा प्लॅन

Vi च्या 39 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी 3GB डेटा देते. या प्लॅनमध्ये फक्त 3 दिवसांची वैधता देखील उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅन्ससाठी तुमच्याकडे ऍक्टिव्ह प्रीपेड प्लॅन असणे आवश्यक आहे.

VI चा स्वस्त आणि लोकप्रिय प्लॅन

जर आपण एका सुप्रसिद्ध प्लॅनबद्दल बोललो, तर VI कडे 99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. मात्र लक्षात घ्या की, काही सर्कल्समध्ये ही वैधता केवळ 15 दिवसांच्या आसपास करण्यात आली आहे. या रिचार्जसह, वापरकर्ते फुल टॉक-टाइम आणि 200MB डेटाचा आनंद घेऊ शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo