भारतातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर Vodafone Idea VI आपल्या प्रीपेड ग्राहकांना अनेक अप्रतिम प्लॅन्स ऑफर करते. हा रिपोर्ट आम्ही खास VI युजर्ससाठी तयार केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, VI एका प्लॅनसह कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Amazon Prime Video सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता VI च्या या प्लॅनची किंमत आणि मिळणाऱ्या बेनिफिट्सची सविस्तर माहिती घेऊयात-
हे सुद्धा वाचा: Affordable! लेटेस्ट TECNO Spark 20C फोन भारतात 16GB RAM सह लाँच, किंमत 8 हजारांपेक्षा कमी। Tech News
VI चा 3,199 रुपयांचा प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये दररोज 100SMS देखील मिळतात. त्याबरोबरच, वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Vi Movies आणि TV चे सबस्क्रिप्शन मिळेल. तुम्हाला VI Hero Unlimited बेनिफिट देखील दिले जातील. ज्यामध्ये Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये OTT बेनिफिट देखील उपलब्ध आहे. हा प्लॅन Amazon Prime Video चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करते. मात्र, हे रेगुलर प्राइम व्हिडिओ सबस्क्रिप्शन नाही. येथे तुम्हाला प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशन मिळेल. ही सदस्यता पूर्ण वर्षासाठी वैध असेल. या प्रीपेड प्लॅनची सेवा वैधता देखील एक वर्षाची आहे.
त्याच्या वापरकर्त्यांसाठी Amazon Prime Video चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करतो. पण हे नियमित प्राइम व्हिडिओ सबस्क्रिप्शन नाही. येथे तुम्हाला Prime Video मोबाईल एडिशन मिळेल. लक्षात घ्या की, हे सब्स्क्रिप्शन देखील संपूर्ण वर्षासाठी वैध असेल. त्याबरोबरच, या प्रीपेड प्लॅनची सेवा वैधता देखील संपूर्ण एका वर्षाची आहे.
लक्षात घ्या की, VI ने अद्याप संपूर्ण भारतात 5G सेवा सुरू केलेली नाही. कंपनीने केवळ राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्रातील पुणे शहरातील काही भागातच 5G सेवा सुरु केली आहे. त्यामुळे इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही या कंपनीच्या नेटवर्कसाठी कितीही पैसे खर्च केले, तरीही तुम्हाला 5G सुविधा मिळणार नाही. या तुलनेत, Jio आणि Airtel कंपनी त्यांच्या वापरकर्त्यांना 239 रुपये आणि त्याहून अधिकच्या प्लॅनसह मोफत 5G नेटवर्क ऑफर करत आहेत.