odafone Idea (Vi) कसे सर्वात पॉवरफुल प्लॅन्स आहेत, जे दीर्घकाळ वैधतेसह येतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, VI कडे 180 दिवसांची म्हणजेच 6 महिन्यांची वैधता असलेला देखील प्लॅन आहे. लक्षात घ्या की, या प्लॅनला सध्या सर्वोत्कृष्ट प्लॅन म्हणता येईल, कारण हा प्लॅन कमी किमतीत दीर्घकालीन लाभ देतो. या प्लॅनची किंमत फक्त 949 रुपये आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता VI च्या सर्वोत्कृष्ट प्लॅनबद्दल तपशीलवार माहिती बघुयात.
Vodafone Idea चा 949 रुपयांचा प्लॅनमध्ये ग्राहकांना Unlimited कॉलिंग ऑफर केली जाते. याशिवाय, प्लॅनमध्ये दररोज 100SMS चीही तरतूद करण्यात आली आहे. प्लॅनमधील उपलब्ध डेटा बद्दल बोलायचे झाल्यास, संपूर्ण वैधतेदरम्यान हा प्लॅन ग्राहकांना एकूण 12GB डेटा ऑफर करतो. तुम्ही हा डेटा संपूर्ण वैधतेदरम्यान वापरू शकता, या प्लॅनमध्ये दैनंदिन मर्यादेनुसार डेटा लाभ उपलब्ध नाही. तुम्ही या डेटाचा वापर वैधतेदरम्यान कधीही करू शकता.
मात्र, या व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये ग्राहकांना इतर कोणताही अन्य लाभ दिला जात नाही. लक्षात घ्या की, VI हिरो अनलिमिटेड लाभ त्याच्या 299 रुपये आणि त्यावरील प्लॅनसह ऑफर करते. पण, तुम्हाला 949 रुपयांच्या VI प्लॅनसह अशी कोणतीही अतिरिक्त ऑफर मिळत नाही. या प्लॅनसह ग्राहकांना कोणताही वेगळा फायदा मिळणार नाही.
VI कडे अद्याप 5G सेवा आलेली नाही. त्याच वेळी, Jio आणि Airtel ची 5G सेवा रोलआऊट होऊन वर्ष उलटला आहे. जर तुम्हाला इतर कोणत्याही 4G रिचार्ज प्लॅनसह रिचार्ज करून डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि SMS चा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही VI चे इतर अनेक रिचार्ज प्लॅन खरेदी करू शकता.
लक्षात घ्या की, तुम्ही कंपनीचे 17 रुपयांपासून सुरू होणारे काही जबरदस्त प्लॅन खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतात. तसेच, VI कडे प्लॅन्समध्ये वीकएंड डेटा रोलओव्हर, बिंज ऑल नाईट डेटा, इ. अनेक लाभ उपलब्ध आहेत. जे तुम्हाला इतर कोणत्याही कंपनीच्या प्लॅनमध्ये ऑफर केले जात नाही.